पिंपरखेड येथे श्रीराम नवमी भक्ती भावाने साजरी

पिंपरखेड ता. भडगांव येथे आज श्रीराम नवमी निमित्ताने गावातील बडगुजर समाज मंडळ पिंपरखेड यांनी यावेळी भगवान श्रीराम व चामुंडा माता यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी पिंपरखेड येथील बडगुजर समाज मंडळाचे अध्यक्ष – श्री. भरत पुंडलिक बडगुजर, मा. उपसरपंच श्री. भरत जुलाल बडगुजर मा. उपसरपंच श्री. भटेसिंग बडगुजर, सचिव – श्री. प्रल्हाद जगन्नाथ बडगुजर, श्री. रविंद्र बडगुजर, श्री. अरुण बडगुजर, श्री. दत्तू बडगुजर, श्री. महेंद्र बडगुजर, तसेच गावातील समाज बांधव व गावातील श्रीराम भक्त, नागरिक यावेळी उपस्थित होते, गावात सर्वत्र भक्ती भावाचे वातावरण होते.
यावेळी पारेश्वर भजनी मंडळ पिंपरखेड व बडगुजर समाज बांधव पिंपरखेड यांचे सहकार्य लाभले.

रामनवमी च्या उत्सवाची बर्‍याच वर्षापासूनची परंपरा अविरतपणे बडगुजर समाज बांधवांतर्फे यावर्षी सुध्दा जल्लोषात साजरी करण्यात आली.

बातमी संकलन – दिनेश बडगुजर, पारोळा

1 Comment

  1. *पिंफरखेडे सरपंच श्री.भरत जुलालआप्पा बडगुजर व समस्त गांवक-यांचेत्य कार्यक्रम आयोजित केलेबद्दल हार्दिक
    अभिनंदनll”बोलो सियाराम प्रभू रामचंद्र की जय”!

Leave a Reply

Your email address will not be published.


*