मुक्ताईनगर तालुक्यातील बोदवड येथे जिल्हा परिषद शाळेवर मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेले राज्य तंत्रस्नेही शिक्षक श्री सुनीलकुमार बडगुजर व प्राथमिक शिक्षिका सौ.स्वाती बडगुजर यांचा मुलगा चि. ईशान बडगुजर याने इयत्ता 5 वीत मास्टर माईंड या परीक्षेच्या चार स्टेज पार करून राज्यस्तरावर गोल्ड मेडल प्राप्त केले व राष्ट्रीय स्तराच्या परीक्षेसाठी पात्र झाला आहे ,ईशान हा मलकापूर येथे MSM स्कुल मध्ये शिक्षण घेत असून यापूर्वी त्याने नॅशनल ऑलम्पियड व बुद्धिबळ स्पर्धेत यश प्राप्त केले आहे.मास्टर माईंड या परीक्षेत स्टेट लेव्हल ला गोल्ड मेडल मिळऊन कुटुंब व समाजाचा लौकिक वाढवला आहे त्याच्या या यशाबद्दल शाळा,आईवडील,आजी आजोबा तसेच बडगुजर समाजातील शिक्षण प्रेमी बांधवांनी तसेच अ. भा. बडगुजर समाज युवक समिती आणि बडगुजर प्राऊड ग्रुप यांनी अभिनंदन करून त्याच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत……..संकलन-प्रणव रतिलाल कोठवाल(फागणे)


Leave a Reply