आज श्रीराम नवमी निमित्ताने एरंडोल येथे दर वर्षाप्रमाणे राम नवमी मोठ्या उत्साहात एरंडोल येथील समाज बांधवांच्या ऊपस्थित साजरी करण्यात आली यावेळी कार्यक्रमाची सुरवात श्री राम जन्मोत्सवाने करण्यात आली.त्यानंतर समाजातील गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी बोलताना आखिल भारतीय बडगुजर समाजाचे सदस्य श्री. प्रविण गोपीचंद रघुवंशी सर यांनी समाज बांधवांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. मधुकर रघुवंशी गुरुजी यांनी केले. एरंडोल बडगुजर समाजाचे सचिव श्री. ताराचंद बडगुजर, जितेंद्र बडगुजर ,शितलदास बडगुजर, प्रभाकर बडगुजर, दिनेश बडगुजर, आदि मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव श्री. रमेश बडगुजर यांनी केला. कार्यक्रमाला एरंडोल येथील बडगुजर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. रामनवमी व विद्यार्थी गुणगौरव समारंभाची परंपरा बर्याच वर्षापासून अविरतपणे सुरू आहे.





Leave a Reply