आज दिनांक – 13/4/2019 रोजी बडगुजर समाज मंडळ, औरंगाबाद तर्फे श्रीरामनवमी निमित्त कुलदेवी चामुंडा माता व श्रीरामचंद्र प्रतिमा पुजन चा धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.सुनिल सुभाष बडगुजर यांनी केले. कुलदेवी चामुंडा माता व श्रीरामचंद्र प्रतिमा पुजन श्री.चंद्रकांत दगडुसेठ बडगुजर व सौ.कल्याणीताई चंद्रकांतशेठ बडगुजर आणि श्री.निलेश भिकासेठ बडगुजर व सौ.कीर्तीताई निलेशसेठ बडगुजर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास समाज बांधव व भगिनी उपस्थित होते.




प्रभू रामचंद्राबाबत आपल्या समाजात जागरुकता वाढत असल्याचे रामनवमीचा कार्यक्रम विविध ठिकाणी घेतले जाणाऱ्या सोहळ्यांमुळे दिसून येत आहे,अत्यंत आनंददायी व समाधानाची बाबl
“बोलो सियाराम प्रभू रामचंद्र की जय”l