धुळे येथील श्री. शशिकांत मनोहर बडगुजर यांची भाजपा धुळे उप जिल्हाप्रमुख पदी निवड

मुळचे फागणे गावाचे व नंतर धुळे स्थाईक झालेले. अखिल भारतीय बडगुजर समाज महासमितीचे सदस्य व धुळे बोर्डिंगचे अधीक्षक श्री मनोहर (अण्णा) बन्सीलाल बडगुजर व धुळे नगरपालिकेच्या माजी नगरसेविका सौ. सुनंदाताई मनोहर बडगुजर यांचे चिरंजीव श्री. शशिकांत मनोहर बडगुजर यांची सामाजिक कार्याची दखल घेत भाजपा धुळे उप जिल्हाप्रमुख पदी निवड करण्यात आली.

धुळे जिल्हाअध्यक्ष भैय्यासो अनुप सेट अग्रवाल यांच्या हस्ते त्यांना निवड पत्र देण्यात आले. याप्रसंगी धुळे मनपा चे महापौर मा. श्री. चंद्रकांत बापू सोनार व तरुणांचे प्रेरणास्थान असलेले नवनिर्वाचित नगरसेवक श्री. देवेंद्र दादा सोनार व तसेच जिल्ह्यातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

शशिकांत भाऊंना पुढील वाटचालीसाठी क्षत्रिय बडगुजर समाज मंडळ, फागणे बाळापूर व क्षत्रिय बडगुजर समाज युवक मंडळ, धुळे यांच्या तर्फे हार्दिक शुभेच्छा.

श्री. शशिकांत मनोहर बडगुजर

बातमी संकलन – श्री. प्रणव कोठवाल सर

शुभेच्छूक

? अ. भा. बडगुजर समाज युवक समिती

? बडगुजर प्राऊड ग्रुप

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*