पूर्वी महिला फक्त घरातील कामकाज आणि मुलांच पालन-पोषण एवढच काम करत असत, चूल आणि मूल हेच जीवन होतं पण आता परिस्थिती बदललेली आहे
महिलांच्या हक्क व सुरक्षिततेसाठी अनेक कायदे व योजना सरकार मार्फत राबविल्या आहेत, ते आपणास माहीत आहे.
तरी आज महिलांवर अत्याचार होताना दिसत आहेत. आज आपण स्त्री-पुरुष समान आहेत असे म्हणतो पण हे खरंच आहे का ?
समानतेची वागणूक मिळते का आज महिलांना ?
यावर विचार मंथन करणे गरजेचे आहे. समाजात स्त्रीयांना समान वागणूक मिळायला हवी या साठी सर्वांनी प्रयत्नशील रहावे.
स्त्री भ्रुणहत्या थांबवा लेक वाचवा
ती भयाण वादळी रात्र आणि ती अघोरी हवा
कुणी बरे विझवला तो चिमणासा दिवा ?
।।१।।
राहिली अशीच स्त्रीभ्रूणहत्या तर मिळेल कशी आई प्रेम देणारी
लाभेल का प्रेमळ बहिण आणि पत्नी ।।२।।
मुलगा-मुलगी समान हा नारा आज प्रत्येक जण देतोच आहे
पण वर्तमानाची स्थिती पाहता मुलीचे प्रमाण घटतच आहे. यावर उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे. मुलगा-मुली भेद आजही केले जातात. ते थांबले पाहिजे. त्यासाठी सामाजिक स्तरावर जागरूकता करावी लागेल. विविध कार्यक्रमांचे आयोजन करून हे करणे गरजेचे आहे.
सौ. लता प्रदीप बडगुजर, भुसावळ

Leave a Reply