समतेच्या वाटेनं तू खणकावीत पैंजण यावं…. तू यावं…तू यावं…… बंधनं तोडीत यावं – सौ. राजश्री संजय भिलमाळ

? महिला दिन विशेष?


रविवार दि.10 मार्च 2019 रोजी महिला दिनाचे औचित्य साधून मला राज्य स्तरीय आदर्श शिक्षक समिती तर्फे पुरस्कार मिळाल्यामुळे नवी मुबई-कोकण परिसर बडगुजर समाज मंडळाकडून सत्कार करण्यात आला….. खरं तर जागतिक महिला दिन हा 8 मार्च रोजी साजरा करण्याच्या करण्यात येतो.पण,आमच्या पनवेलकरांनी हा संपूर्ण आठवडाच जागतिक महिला आठवडा साजरा म्हणून सत्कारणी लावला…..या दिवशी माझ्या पनवेलकर सख्यांनी आदिमाया शक्ती,जिजाऊ,अहिल्याबाई,सावित्रीबाई फुले,बहिणाबाई पासून ते इंदिरा गांधी,लतादिदी, कल्पना चावला,हेमा मालीनी, सानिया मिर्झा यांसारख्या थोर महिलांच्या वेशभूषा खूप हुबेहूब साकारल्या……खरंच या थोर महिलांनी किती प्रतिकूल परिस्थितीत आपले अस्तित्व सिद्ध करून दाखवले आहे.त्यांच्यापासून आपण नक्कीच प्रेरणा घेतली पाहिजे.शेवटी सांगावेसे वाटते. …..
समतेच्या वाटेनं तू खणकावीत पैंजण यावं….
तू यावं…तू यावं……
बंधनं तोडीत यावं

तसेच बडगुजर वेब पोर्टल टिमने संपूर्ण टीमचे मनःपुर्वक धन्यवाद. सामाजातील महिलांसाठी आपण एक आगळ्यावेगळ्या पद्धतीने महिला दिन विशेष सप्ताह साजरा करत आहात. आपल्या उपक्रमास हार्दिक शुभेच्छा. ?

 ? *शब्दांकन* ?

सौ.राजश्री संजय भिलमाळ
✒✒✒✒✒✒✒

सौ. राजश्री संजय भिलमाळ

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.


*