अवाजवी अपेक्षेमुळे लग्न जमविणे अवघड – श्रीमती सुनंदा विष्णू बडगुजर

आजच्या परिस्थितीची बीजे भूतकाळात रोवलेले आढळतील. कारण आपण माना अथवा न माना पण ३० वर्षे अगोदर जी समाज व्यवस्था त्यात वधू पिता होणे म्हणजे महापापच होते. जणू तत्कालीन लोकांनी या मान मर्यादा ओलांडून वधू पित्यास अपमान जनक वागणूक दिल्याची शेकडो उदाहरणे समाजात सापडतील. हुंडा, मानपान व बाबींचा विचार करता मुलींच्या पालकांचे जे हाल समाजाने केलेत (रूढींच्या नावाखाली) ते खरोखरच असहय होते. स्त्री-पुरूष समानता नाकारणारे होते. तेव्हा समाजच या बाबींना खतपाणी देत होता. हे आपण आपल्या सोयीने विसरतो आहे. अनादी काळापासून स्वयंवराची जोपासना करणारा हिंदु समाज कधी कंठीत जाती पुरता मर्यादित झाला हे त्याचे त्यालाही कळले नाही. आपण म्हणतो मकाळ प्रत्येकाला संधी देतो. काल मुलीवाले त्रस्त होते. आज मुलावाले आहेत एवढेच. स्त्री-पुरूष समानता जर कायद्याने दिली आहे तर आपण दुटप्पी का वागतोय? असे मला वाटते. पंचवीस ते तीस वर्षा पूर्वीची ती एकंदर परिस्थिती आठवली तर वाईट वाटते. हाल होते म्हणून वधू पक्षाचे कुचंबना होत होती. आगतिक होत होता. मुलीचा बाप (नको रे मेला हा मुलीचा जन्म…) आता मुलीच्या जन्माचे स्वागत करायला लागलाय. ही स्वागतार्थ बाब आहे. काळ बदलला–परिवर्तन घडत आहे. हा स्वतंत्र विचारांचा व पुरोगामीत्व विचारांचा काळ आहे. पुरोगामी विचारांमुळे आणि कायद्याच्या संरक्षणामुळे मुला-मुलींच्या स्वातंत्र्यावर बंदी आणता येणे अशक्य. पुरोगामी विचारांचे स्वागत करू या. ते करावेच लागेल.
आपल्याला मुलगाच हवा. मुलींची पालन पोषणाची लग्नाची व इतर जबाबदारी नको म्हणून तरूण मंडळी गर्भारपणातच लिंग तपासणी करून मुलीचा गर्भ अंसता तर गर्भपात करून घेऊ लागली. त्यामुळे सर्वत्र गुंतागुंतीची व खंगत चाललेली समाज व्यवस्था सर्वत्र दिसत आहे. मुलींच्या मागच्या पिढ्यांनी प्रचंड बलिद ने आहे. तेव्हा ते आजचे
स्वातंत्र मिळवले आहे. प्रबोधन हाच मार्ग उरला आहे. समाजातील मुले-मुली व पालकांचे प्रबोधन करावे लागेल. संस्काराचे म्हणाल तर घरोघरी चांगले केल्या जातात. समाज हिताचा ति व्हावा समाजातील होतकरू, उद्योगशील व नि तरूणांना प्राधान्य वधू पक्षाचे द्यावे. आज समाजात दिवसेंदिवस लग्न समस्या वा चालल्या आहेत. २१ वे शतक खरोखरच ति समस्येला सुरूंग लावणारे उजाडले. इंटरनेट, फेसबुक, वॉटसअॅप संगणकाच्या व मोबाईल माध्यमातून सर्वांनिच नको त्या वेगाने धावा सुरूवात केली आहे. एक विशेष कौतुक करण्यासार बाब म्हणजे मुलांनीच प्रगती केली असे नाही तर मुलीही या क्षेत्रात प्रगती करू लागल्या. स्त्री स्वातंत्र्याला प्राधान्य मिळाल्याने मुलींनीही प्रगती साधली. त्यामुळे विवाह संस्थेचे २१ व्या शतकात एक वेगळेच वळण घेतले आहे. आज विवाह पध्दती, शिक्षण पध्दती यातील आचार-विचार, नितिमत्ता ही एक वेगळाच आकार घेऊ लागलो आहे.

मुलींच्या शिक्षणासाठी शासनाच्या भरपूर सवलती असल्यामुळे ब-याच मुली उच्चशिक्षित होतात. त्यामुळे तिच्यासाठी उच्चशिक्षित मुलगा शोधतात. आपली मुलगी जेमतेम १० वी, १२ वी, बी.ए. असली तरी पालकांच्या कल आपल्या मुलीसाठी उच्चशिक्षित व भरपूर पगाराच्या नोकरीवालाच मुलगा हवा असतो. आजच्या लग्न समस्येला मुलगी जबाबदार नसून मुलीचे पालक म्हणजे आई-वडील हेच जबाबदार आहेत. मुलगी शिकलेली आहे. पगारी आहे. दोन पैसे कमवेत त्यामुळे पालक खूपच आनंद व समाधान व्यक्त करतात. त्यामुळे तिच्यासाठी ते तिच्या लायक स्थळ शोधीत असतात. या कालावधीत मुलीचे बाहेर जाणे, येणे, बोलणे यामुळे बाहेरच्या मुलांशी संबंध येतोच. आणि ते वयात असल्याने साहजिकच वयाच्या आकर्षणाने प्रेमा बाबत सुप्त गुण जागृत होतात. त्यामुळे त्यांचे केव्हा आणि कोणाशी प्रेमाचे संबंध येतात हे कळतच नाही. जेव्हा प्रेमाचे रूपांत्तर लग्नात येऊ पाहते. तेव्हा मात्र आई-वडील घाबरतात. काही उच्चशिक्षित मुलांच्या बाबतीतही हीच परिस्थिती जबाबदार असते. अशा वेळेस समाजात बदनामी 214 च्चशिक्षित मुलांच्या बाबतीतही हीच परिस्थिबाबदार असते. अशा वेळेस समाजात बदामी होवू नये म्हणून समाजातील मुलाशी/मुलीशी विवाह करून दिला जातो.

दोन्ही पक्षाचा अमाप पैसा खर्च होतो. तरीही लग्नानंतर दुस-याच दिवशी घटस्फोटाची मागणी करतात आणि शेवटी घटस्फोट होतोच. अशी एक ना अनेक विवाह समाजात मोडकडीस आलेली आहेत. हे पाहून मनाला खूप दुःख होते. वाईट वाटते. रडू कोसळेत. आणि ज्यांच्या घरी लग्न मोडले असेल त्यांच्या घरी काय परिस्थिती असेल ते सांगायलाच नको. आपला समाज भरकरट चालला आहे. विकासासाठी, गुणवत्तेसाठी धडपडत आहे. ही चांगली गोष्ट आहे. परंतु लग्न जमवतांना अडचणी येत आहेत. पूर्वीची समाज मंडळी या गोष्टींना फारच जपत होती. सोळावं वरीस धोक्याच हे ते जाणून होते. मुलगी वयात आली किंवा वयात येण्यापूर्वीच पालक तिच्या लग्नाची काळजी करून ती सोडवण्यास तयार राहात. मुलगी सर्व साधारण पणे १५ ते १८ वयातील मुलगी ख-या अर्थाने सज्ञान होते. हे ते जाणून होते. म्हणूनच १५ ते १८ वयोगटातील मुलींची लग्ने जवळ-जवळ १००% होऊन जात. या वयोगटातील मुलींचे लग्न योग्य ते स्थळ पाहून करून देत होते. काळ बदलला असला तरी प्रवृत्ती व प्रकृतीत फरक नाही या गोष्टीकडे आजचा समाज दुर्लक्ष करीत आहे. त्याचेच परिणाम आज शेतकरी, शेतमजूर व लहान उद्योजक यांचे लग्न समस्येवर झालेला आहे. मशेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे.फतर तो आपले कुटुंब पोसू शकणार नाही का? नोकरीवाल्याच्या घरात महिना अखेरीस डबे खण खण वाजतात. आणि शेतकरीच्या घरात पोत्यांच्या थप्या लावलेल्या असतात.
आज मुला-मुलींच्या लग्नासाठी आईचे मत, वडीलांचे मत आणि मुला-मुलींचे मत म्हणजे तीन मतांचा त्रिकोण तयार होतो. म्हणजेच तीन तिघाडा आणि काम बिघाडा. अशी एक जूनी म्हण आहे. पूर्वी घरातील प्रमुख व्यक्ती आजोबा असो, बाप असो, किंवा काका असो त्यांनी सांगावे तेच होत होते. आता ते न राहिल्याने विवाह समस्या गुंता गुंतीची होत आहे. पूर्वी घरातील कुटुंब प्रमुख सहजासहजी मुला-मुलींचे लग्न जमवत होते. त्यांचेही संसार सुखी होते. आज ती परिस्थिती राहिलेली नाही. जवळ जवळ संपुष्टात आलेली आहे. केवळ नोकरीवालाच मुलगा पाहिजे. हा वधू पक्षाने केलेला निर्धार हा एक समाज घातकी निर्धार आहे.
त्याला वाटते माझी मुलगी सुखात राहिली पाहिजे. ती मुलगी नोकरी करणाच्या मुलाला दिली म्हणजेच सुखात राहू शकते. हा समजच चुकीचा आहे. कारण नोकरी करणा-याचा पगार जेमतेम १० ते १२ दिवस टिकतो. आणि धंदा व्यवसाय करणारा किंवा शेतकरी, शेतमजूर यांच्याकडे कायम स्वरूपी पैसा हातात खेळत राहतो. आणि धन धान्याने घर कायम स्वरूपी भरलेले असते. एवढे असल्यावरही नोकरी वालाच मुलगा पाहिजे. हे समिकरण बदलविणे काळाची समाज बांधवांच्या मुला-मुलींची वये वाढत आहेत. त्यामुळेच मुलं-मुली आंतरजातीय विवाहाकडे वळत आहेत. त्यामुळे समाज व्यवस्था पार कोलमडून गेली आहे. आता पुढे समाज हा समाज म्हणून राहणार की नाही अशी शंका वाटत आहे. आज वैज्ञानिक, सामाजिक व शैक्षणिक दृष्टीकोनातून खूपच बदल झालेला आहे. आज सर्वत्र विभक्त कुटुंब व्यवस्था झाली असल्याने नोकरी निमित्त म्हणा किंवा धंद्या गावी किंवा शहरात स्वतंत्र संसार थाटतात-धावपळीच्या जीवनात त्यांच्या आपल्या कुटुंबाशी किंवा समाजाशी संपर्क अल्प झालेला असतो. शहरातील नोकरीमुळे आकर्षित होऊन संस्कार आणि संस्कृती लयास जात असल्याने माणूस फक्त माणूस राहिला तो समाजातपासून समाज संस्कृती व संस्कार या पासून दूर जात राहिला. आजचा वधू पालक नोकरीवाला भरगच्च पगारवाला जावई तर पाहिजेच परंतु मुलगा एकटाच हवा. त्याला बहिण वगैरे नको. मुलाचे आई-वडील मुलावर अवलंबून तर नाहीत ना? या सा-या गोष्टींचा विचार करून लग्नाबाबत विचार करतात. पूर्वी शेती, घरदार, खानदान पाहून विवाह जुळवले जात. नोकरी कनिष्ठ मानली जात होती. आज विभक्त कुटुंब पध्दतीमुळे शेती, घरदार आणि खानदानाची वाटणी झाली आहे. आज अनेक मुलं-मुली उच्च शिक्षित आहेत. सरकारी नोक-या नाहीत. व छोट्या मोठ्या कंपनीतील तुटपुंज्या पगारावर त्यांचा उदरनिर्वाह होत नाही. त्यामुळे नैराश्येचा खाईत. आजचा तरूण भरडला जात आहे. ना नोकरी, ना लग्न मग कसं होणार? परक्या समाजातील मुली दलालाच्या मार्फत पैसे देऊन विकत आणतात. त्या पेक्षा समाजातील मुली/मुलांचा विचार करावा. आज त्यांच्या वयाचा विचार केला तर ३० ते ४० वयाच्या घरात आहेत. माझ्या सांगायचा उद्देश १ निसर्गाचा नियम आहे. असे झाले तरच त्यांच्या जन्माचे व जीवनाचे सार्थक होईल, पूर्वीसारखे मुले-मुली शोधण्यासाठी गावोगावी जावे लागत नाही. समाजातील उपवर मुला-मुलींची संपूर्ण माहिती फोटोसह वधू-वर परिचय मेळावा च्या पुस्तकात उपलब्ध आहे. बडगुजर समाजातील मुला मुलींची माहिती या पुस्तकात असूनही विवाह जमण्यास वेळ का लागतो? कारण वधु वर मेळावा च्या पुस्तकामुळे अनेक स्थळे पालकांना दिसतात. त्यामुळे हे स्थळ चांगले की ते चांगले अशा संभ्रमात पडतात. त्यामुळे विवाह जमण्यास दिरंगाई होते .बऱ्याच पालकांना वाटते माझा मुलगा चांगला उच्चशिक्षित आहे .पगारही चांगला आहे. कमवतो आहे .मी का त्याच्या लग्नाची घाई करू? मुलींच्या पालकांना ही तेच वाटते मुलगी तिच्या पायावर उभी आहे.नोकरी करते तिच्यासाठी चांगला वर पाहू घाई काय आहे अशा मुला-मुलींचे विवाह थांबलेले आहेत. शेतकरी, शेतमजूर, छोटे मोठे व्यवसाय, अशा मुलांकडे मुलीवाले आकर्षित होत नाहीत. त्यांना वधु वर मेळावा च्या पुस्तकात बऱ्यापैकी शिकलेली नोकरी करणारी मुले दिसतात. आपल्या मुली योग्यतेच्या नसल्या तरी त्यांनाही वाटते की मला चांगला पगारदार नोकरीवाला जावई पाहिजे म्हणून तो आपल्या मुलीचा विवाह लांबणीवर टाकतो.
अशा विविध कारणांमुळे मुला-मुलींचे वय तिशीच्या वर गेलेली आहेत. अशावेळी विवाहास उशीर करणे अत्यंत धोकादायक आहे. जोपर्यंत मुले-मुली आपल्या ताब्यात असतात तोपर्यंत तडजोड करून पटकन विवाह जमवावा. वाढत्या वयामुळे मुले-मुली आंतरजातीय विवाह कडे वळतात अशी एक नाही तर अनेक विवाह आपण ऐकलेले आहेत डोळ्यांनी पाहिलेली आहेत अनुभवलेले आहेत कोणाच्याही मुला मुलींचा आज भरोसा नाही. आमचे संस्कार असेतसे म्हणण्याचा काळ राहिलेला नाही. अशा भ्रमात कोणीही राहू नये समाज टिकवायचे असेल तर प्रत्येक घरातील प्रत्येक मातापित्यांनी कठोर निर्णय घेणे गरजेचे आहे. वेळीच सावध व्हा नाहीतर पश्चातापाची वेळ येईल.

लेखन – श्रीमती सुनंदा विष्णू बडगुजर, म.रा .आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त.

श्रीमती सुनंदा विष्णू बडगुजर, म.रा .आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त.

2 Comments

  1. सुनंदा विष्णू यांचा लेख म्हणजे आत्ताच्या मुला मुलींच्या आईवडिलांच्या डोळ्यात अंजन आहे उघड डोळे पहा नीट। ववा सुनंदाताई तुमचे अभोनंदन

Leave a Reply

Your email address will not be published.


*