? मला सन्मानाने जगायचे आहे ?‍♀

काळालाही आहे गरज, असं माझ अस्तित्व भेटायचे आहे,
शोध घेण्यासाठी स्वतःचा एकेक ध्येय गाठायचे आहे,
मला सन्मानाने जगायचे आहे।
मला सन्मानाने जगायचे आहे।

आमची प्रेरणा सावित्रीबाई, पांग तिचे फेडायचे आहे,
स्री-शिक्षणाची कास घेऊन हिमतीवर घडायचे आहे,
मला सन्मानाने जगायचे आहे।
मला सन्मानाने जगायचे आहे।

‘मुलगी शिकली, कुटुंब शिकले’ हे सत्य मला पोसायचे आहे,
‘मुलगी शिकली, प्रगती झाली’ या आलेखात बसायचे आहे,
मला सन्मानाने जगायचे आहे।
मला सन्मानाने जगायचे आहे।

खरेदी-विक्री वा गुंतवणूक सारे व्यवहारज्ञानही शिकायचे आहे,
फक्त ‘चूल अन् मूल’ या लादलेल्या कामात ना थकायचे आहे,
मला सन्मानाने जगायचे आहे।
मला सन्मानाने जगायचे आहे।

कल्पना चावला, किरण बेदीसारखी मजल मारत चालायचे आहे,
दुर्बलतेची कात टाकून सबलतेचं तेज लावायचे आहे,
मला सन्मानाने जगायचे आहे।
मला सन्मानाने जगायचे आहे।

क्रूरता हाणून पाडून ढाल दुर्बलांची बनायचे आहे,
ज्योतीचे जरी रूप माझे प्रसंगी मशालीत आणायचे आहे,
मला सन्मानाने जगायचे आहे।
मला सन्मानाने जगायचे आहे।

नखशिखांत मला सजवलयं त्या बेड्यांना जाळायचे आहे,
स्री-लंपटांचे अंगअंग नव्या शस्त्रांनी पोळायचे आहे,
मला सन्मानाने जगायचे आहे।
मला सन्मानाने जगायचे आहे।

परीक्षा सितेचीही घेणाऱ्या शंकांना आता मिटवायचे आहे,
स्रीला अपराधी ठरवाणार्या पापी विचारांना हटवायचे आहे,
मला सन्मानाने जगायचे आहे।
मला सन्मानाने जगायचे आहे।

पदराचे बनवून निशाण अंबराला भिडवायचे आहे,
त्यावरी नवशतकांच्या गरजपुर्तीचे कार्यरत्न जडवायचे आहे,
मला सन्मानाने जगायचे आहे।
मला सन्मानाने जगायचे आहे।

कविता लेखन – सौ. वंदना मदनशेठ बडगुजर, पनवेल

सौ. वंदना मदनशेठ बडगुजर पनवेल

3 Comments

  1. सुदर असा उपक्रम सर्व टिमचे अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी संपूर्ण टीम ला अभिमान पणाने शुभेच्छा

Leave a Reply to Lokesh Kotwal Cancel reply

Your email address will not be published.


*