आजकाल लग्नांचे सनई-चौघडे सगळीकडे वाजत आहेत. लग्न म्हटलं म्हणजे दोन कुटुंब जुळली जातात. नातेसंबंध वाढतात. पुर्वी तर वधु-वर यांचा चेहरा न दाखवता लग्न ठरायच. पण, आता सर्व बदललेले आहे. आपण २१व्या शतकाकडे वाटचाल करत आहोत. आता मुले-मुली स्वतः ठरवतात कि त्यांना कसा जोडीदार हवा. त्यांना जसा जोडीदार हवा ते पसंत करू शकतात. पुर्वी लग्नपत्रिका वाटण्यासाठी घरोघरी जावे लागायचे. त्यात साहजिकच वेळ व पैसा खर्च करावा लागायचा. आता तर इंटरनेट आले आहे. खुप सार्या सोई-सुविधा उपलब्ध आहेत. जसे की मेसेंजर, व्हाट्सएप, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, टेलेग्राम, ईमेल आणि बरेच काही. पुर्वी, लोक लग्न म्हणजे एक सन म्हणून साजरा करायचे. ज्यात पाच-सहा दिवस तरी धामधूम असायची. त्यात हळदी समारंभ, बँड, रात्रवरात निघणे, लग्न गाणी आणि बर्याच गोष्टी. पण, कालांतराने काळ बदलला, वेळ बदलली, स्वरूप बदलले, पीढी बदलली. तरीही काही ठिकाणी या गोष्टी आजही बघावयास मिळतात. पुर्वी लग्नासाठी घराच्या समोर किंवा अंगणात मंडप पडायचा. पण आता आपण एखाद्या मोठ्या सभागृहात किंवा लाँनमध्ये लग्न करण्यासाठी उत्सुक असतो. पुर्वी लग्नासाठी बँडवाजा लावायचो, आता मोठे होम थेटर किंवा डीजे लावण्यास पसंती देतो. तसं, म्हटल तर लग्न करण्यासाठी आज बरेच मार्ग आले आहेत. प्रत्येकजण आपापल्या परीने लग्न ठरवून करत असतात. कसे लग्न करायचे, कुठे लग्न करायचे या आपल्या आवडी-निवडी असतात. जसे कि, लग्नमंडप, लग्नसभागृह, सामुहिक विवाह सोहळा, कोर्ट-मँरेज, देवाचे मंदिर, डेस्टिनेशन लग्न आणि इतर बरेच प्रकार.
पुर्वी हुंडा, आंदन आणि आहेर या तीन गोष्टींवर जास्तीत जास्त भर दिला जायचा. त्यात आणखी एका गोष्टीची भर पडली, ती म्हणजे रीसेप्शन. या चार गोष्टींवर लग्नाचा सर्वाधिक खर्च होत होता आणि आजही होत आहे.
जास्त अपेक्षांचे ओझं, कौटुंबिक परिस्थिती, शेती-नोकरी-व्यवसायासंबंधीचा गैरसमज, मुला-मुलींचे वाढते वय, आंतरजातीय विवाह, प्रेमविवाह या गोष्टींनी समाज त्रस्त झाला आहे. त्यामुळे समाजात नकारात्मकता, कटुता, विषमता, भेदभाव, मानापमान यांच प्रमाण बघावयास मिळते आहे.
जर आपल्याला वाटते हे बदलायला पाहिजे, तर सुरवात ही स्वत: पासून करावीच लागेल. हे २१सावे शतक आहे. नवीन तंत्रज्ञान आलेले आहे. आपल्याला जगासोबतच चालावे लागेल आणि एक आदर्श व प्रगत समाज घडवावा लागेल. समाजातील बर्याच चालीरीती व रूढी बंद कराव्या लागतील. जसे, हुंडा देण-घेणे, आंदन देणे-घेणे, आहेर देणे-घेणे, रीसेप्शन देणे, घरोघरी लग्नपत्रिका वाटणेच, लग्नाचे भाडे देणेच आणि बर्याच प्रथा.
पण, आता या गोष्टींना आळा घालण्यासाठी समाज प्रयत्न करतो आहे. त्यासाठी समाजातील विविध स्तरांतून विविध उपक्रम घेतले जात आहेत. समाजाला विविध समाज मंडळांची साथ मिळत आहे. ही समाज मंडळे अखिल भारतीय बडगुजर समाज महासमीती अंतर्गत कार्यरत आहेत. प्रत्येक मंडळ आपल्याला परीने उत्कृष्ट कार्य करत आहे. जसे की, वधुवर मेळावा, सामुहिक विवाहसोहळा, मँट्रीमोनियल वेबसाईट ( www.badgujar.in/vivah.badgujar.com ) व अँप्लिकेशन ( Badgujar ) आणि बरेच उपक्रम या गोष्टींनी समाज एकत्र येत आहे व एकमेकांशी जुळला जात आहे.
नेहमी लक्षात ठेवा, आपले सगेसोयरे व परिवार म्हणजे आपल कुटुंब नाही, तर संपूर्ण समाज हा आपले खरे कुटुंब आहे. जसा कुटुंबातील जर एखादा कार्यक्रम, उपक्रम, सोहळा, मेळावा आपण संपूर्ण कुटुंबातील लोकांनी खर्च करून केलेला असतो, त्याचप्रमाणे समाजातील सर्व कार्यक्रम, उपक्रम, सोहळे, मेळावे हे समाजातील लोकांनी दिलेल्या देणगीवरच केले जातात. हे नेहमी लक्षात असु द्यावे. आपल्याला जर एक आदर्श समाज घडवायचा असेल. तर, एकमेकांना साथ ही द्यावीच लागेल. आपल्याला समाज अगोदर, कुटुंब नंतर ही भावना प्रत्येकाच्या मनात रूजवावी लागेल. आपण सर्वांनी एकत्र आल्याशिवाय हे शक्य नाही.
आपणास एक उदाहरण देता येईल, समजावे एखाद्या घरात लग्न जुळले आणि वरील सर्व गोष्टी म्हणजे हुंडा, आंदन, आहेर, रीसेप्शन या चालीरीती आपणास नकोय, पण आपणास प्रश्न पडला असेल की याचा समाजाला कसा उपयोग होईल? जर कुणाला हुंडा द्यायला किंवा घ्यायचाच असेल तर समाजाला द्यावा, कुणाला आहेर द्यायचा किंवा घ्यायचाच असेल तर समाजाला द्यावा, कुणाला आंदन द्यायचे किंवा घ्यायचेच असेल तर समाजाला द्यावे ( घरगुती वस्तू, कपडे वैगरे ), रीसेप्शन द्यायचेच असेल तर रीसेप्शनमध्ये समाजातील एखादा कार्यक्रम ठेवावा किंवा रीसेप्शनमध्येच समाजातील गरीब मुला-मुलींचे लग्न लावून द्यावे. या सगळ्या गोष्टींनी आपणास स्वतःला आणि समाजाला दुहेरी फायदा व आनंद होईल. याने अवाजवी खर्च तर वाचेलच पण त्याहीपेक्षा समाजाला मोठ्या प्रमाणात देणगी उपलब्ध होईल. याच देणगीतून समाजातील सामुहिक लग्नमेळावे, वधुवर मेळावे, लग्न-सभागृहांची स्थापना, लग्न समारंभ मंडप, लग्नाची भांडी घेतली जातील. नंतर याच लग्नमेळाव्यात, लग्नसमारंभ मंडपात, लग्न-सभागृहात समाजातील गरीब मुला-मुलींचे लग्न जुळतील, त्यांच्या लग्नाला लागणारा खर्च वाचेल, त्यांना समाजातील विविध स्तरांतून आलेल्या देणगीतून मदत व आशिर्वाद मिळेल व त्यांचा खरा जीवनक्रम सुरू होईल.
खरतर, या संकल्पनेचा लेख मांडुन समाजातील एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर प्रकाश टाकण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे. मान्य आहे की, प्रत्येक समाज बांधवांचे हे आपापले मत असते आणि असणार. अशी खात्री आणि आशा आहे की, आपल्या समाजातील लोक या विषयावर विचार करतील व या संकल्पनेला प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी प्रयत्न करतील.
आपलाच समाजसेवक – राहुल बडगुजर, पुणे ( बडगुजर प्राऊड गृप ).

।। जय चामुंडा माता ।।

Leave a Reply