दिनांक 8 मार्च 2019 रोजी सुरत (गुजरात ) या
ठिकाणी चि. हितेश राजेंद्र बडगुजर, श्री. राजेंद्र कडू बडगुजर यांचे चिरंजीव आणि चि. सौ. का. जानव्ही प्रल्हाद बडगुजर, श्री. प्रल्हाद तानकु बडगुजर यांची सुकन्या यांच्या
लग्नसोहळ्यात बडगुजर युवा संघटन चे सदस्य आणि वेब पोर्टल प्रतिनिधी श्री. ज्ञानेश्वर संतोष शेठ बडगुजर यांनी आई चामुंडा मातेची प्रतिमा सप्रेम भेट देऊन www.badgujar.in – एक समाज एक व्यासपीठ या वेबपोर्टलची माहिती आलेल्या सर्व समाजबांधवांना तसेच मित्र परिवाराला चांगल्या रीतीने समजुन सांगितले. लग्न समारंभात वेबपोर्टलचे जाहीर लोकार्पण केले. त्याबद्दल बडगुजर युवा संघटन, सुरत चे हार्दिक आभार. नवीनच लग्न झालेल्या नवदांपत्यास पुढील आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा??



सुरत किंवा गुजरात विभागातील सामाजिक कार्यक्रम विषयक बातम्या, घडामोडी, यशप्राप्ती, समाज मंडळ माहिती, व्यापार विषयक माहिती, नोकरी विषयक माहिती इ. बातमी स्वरूपात द्यावयाची असेल तर संपर्क करा.
श्री. विजय कोतवाल – 8460291938
श्री. ज्ञानेश्वर बडगुजर – 9726892271
बडगुजर युवा संघठन, सुरत यांचे मनःपूर्वक आभार… आपली साथ आम्हास लाभणे फार महत्त्वाचे आहे. प्रेरणा आणि सकारात्मक ऊर्जा मिळते आपल्या या कार्यातून… जी एकात्मतेची भावना आणि विचार आपण जोपासत आहात ते फार महत्त्वपूर्ण आणि अकल्पनीय आहे… आपले मनःपूर्वक आभार, शुभेच्छा, धन्यवाद…
शुभेच्छूक :
- अ. भा. बडगुजर समाज युवक समिती
- बडगुजर प्राऊड ग्रुप

आपण ज्या ही प्रसंगात जातो त्या ठिकाणी एक शब्द तरी समाज सुधारणे साठी घ्यावा
एक समाज एक व्यासपीठ वेबपोर्टल सुरु केले आहे, त्यामुळे समाजाच्या उन्नतीसाठी त्याचा नक्की फायदा होईल तरुण पिढीला खूप खूप हार्दिक शुभेच्छा,