*जागतिक महिला दिनानिमित्त दि.8-3-2019 रोजी दु.4 वाजेला भुसावळ शहर जागृती महिला मंडळाकडून स्तुत्त्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

अध्यक्षस्थानी डॉ.सौ.श्रद्धा उमेश बडगुजर होत्या
अ. भा. ब.समाजाचे अर्थमंत्री श्री.सुरेश महाले साहेब व सौ.विजयाताई महाले यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे वैशिष्ठःजेष्ठ महिलांचा सत्कार करण्यात आला
स्वतःचा गृहऊद्योग, पतीदेवाचा हाॕटेल व्यवसाय व आजारी मुलाची देखभाल करणाऱ्या सौ.संजय बडगुजर याचा विशेष सत्कार्थी म्हणून गौरविण्यांत आले.

सदरप्रसंगी “बेटी बचाओ” या विषयावर बालिकांनी नृत्य सादर केले.बालीका नृत्यांगनाचा सौ.श्रद्धा बडगुजर यांनी गुलाबपुष्प देऊन गौरविले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात सौ.श्रद्धा बडगुजर यांनी महिलांच्या आरोग्याबद्दल माहिती देतांना स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देत कुटुंबातील व्यक्तींचीहि काळजी कशी घ्यावी या विषयावर मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमाचे आयोजन श्री.गुलाबराव सुकलाल बडगुजर यांच्या निवासस्थानी करण्यात आले. सर्वानी सुरूची भोजनाचा आस्वाद घेत कार्यक्रमाची सांगता झाली

भुसावळच्या कार्यक्रमात बालीकांना संधी देणेचा स्तुत्त्य कल्पना