स्वामी विवेकानंदांच्या अशा 10 गोष्टी, ज्यामुळे तुमच्या सर्व अडचणी नष्ट होऊ शकतात

स्वामी विवेकानंद

स्वामी विवेकानंद यांचा जन्म कोलकाता येथे 12 जानेवारी 1863 मध्ये झाला होता. स्वामीजींच्या वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त आणि आईचे भुवनेश्वरी देवी होते. स्वामीजींचे मूळ नाव नरेंद्रनाथ होते. याचे गुरु रामकृष्ण परमहंस होते. स्वामीजींचे वडील हायकोर्टात ऍटर्नी ऑफ लॉ होते. स्वामीजींनी कोलकाताच्या कॉलेजमधून बी.ए. आणि लॉ डिग्री घेतली होती परंतु त्यांचे मन अध्यात्माकडे होते. 1893 मध्ये शिकागो येथे झालेल्या विश्वधर्म सभेत स्वामी विवेकानंद यांनी भाषण केले. या भाषणामुळे त्यांना सर्वत्र ख्याती प्राप्त झाली. त्यांनी रामकृष्ण परमहंस मिशनची स्थापना केली. येथे जाणून घ्या, स्वामीजींचे असे काही विचार, जे तुमचा जगण्याचा दृष्टिकोन बदलू शकतात…

आपण जेवढे जास्त कष्ट करतो, यश तेवढेच उज्वल राहते.

कोणत्याही प्रकराची भीती आणि अपूर्ण इच्छा सर्व दुःखाचे कारण आहे.

स्वतःला कमजोर किंवा लहान समजणे हेच सर्वात मोठे पाप आहे.

ज्या दिवशी कामामध्ये कोणतीही समस्या येणार नाही त्यादिवशी समजून घ्यावे की, आपण चुकीच्या मार्गावर आहोत.

जोपर्यंत आपण स्वतःवर विश्वास ठेवत नाहीत तोपर्यंत देवावरही विश्वास ठेवू शकत नाहीत.

सुख आणि दुःख हे दोघेही चांगले शिक्षक आहेत, आपल्याला नेहमी शिकवत राहतात.

ज्या गोष्टी शारीरिक, मानसिक आणि अध्यात्मिक रूपात आपल्याला कमजोर बनवतात, त्यांचा लगेच त्याग करावा.

जेव्हा मनाचे आणि मेंदूचे ऐकण्याची गरज पडेल तेव्हा सर्वात पहिले मनाचे ऐकावे.

अनुभव हा सर्वश्रेष्ठ शिक्षक आहे.

स्वतःसाठी सगळेच जगतात, इतरांसाठी जगणे हेच जीवन आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*