विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत तुम्ही बालभारतीने तयार केलेल्या सराव कृतीपत्रिका सोडवल्या असतीलच याबरोबरच माय इंग्लिश कोर्स बुक च्या माध्यमातून सुद्धा तुमचे अध्ययन व आकलन झालेले असेलच यात कुठलीच शंका नाही विद्यार्थी मित्रांनो ऍक्टिव्हिटी शीट मधील पहिला विभाग हा लांग्वेज स्टडी वर आधारित असतो यात एकूण वीस गुणांपैकी प्रश्न पहिल्या अ मध्ये तुम्हाला 16 गुणांसाठी 8 ऍक्टिव्हिटीज दिलेले असतात.

1) या पहिल्या ऍक्टिव्हिटी मध्ये रिकाम्या जागी योग्य अक्षर भरून अर्थपूर्ण शब्द तयार करावा लागतो यासाठी वेगवेगळी अक्षरे आजमावून पहावी.
2) या कृतीत प्रश्नपत्रिकेत दिलेली दोन वाक्य जशीच्या तशी लिहावी लागतात हे करताना नेहमी लक्षात ठेवा व्यक्तीचे नाव हे कॅपिटल लेटर ने सुरु होते वाक्यात दिलेली विराम चिन्हे व स्वल्पविराम काळजीपूर्वक पाहून लिहावीत. 3) शब्द मुळाक्शरांच्या क्रमाने म्हणजे अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये लिहावे लागतात यासाठी प्रत्येक शब्दाची सुरुवात कोणत्या अक्षराने झालेली आहे ते पाहावे जर एकाच अक्षराने चारही शब्दांची सुरुवात झाली असेल तर त्या एका अक्षरानंतर येणाऱ्या दुसऱ्या अक्षरा नुसार क्रम लावून दिलेले शब्द लिहावेत.
4) या कृतीत योग्य ठिकाणी कॅपिटल लेटर्स कोटेशन मार्क कॉमा फुल स्टॉप क्वेश्चन मार्क उद्गारार्थी चिन्ह द्यायला विसरू नका.
5) एका मोठ्या शब्दापासून कमीत कमी तीन अक्षरांचा अर्थपूर्ण छोटा शब्द तयार करणे मनात असे शब्द तयार करून अचूक उत्तर लिहा.
6) वाक्यातील चुक शोधून बरोबर लिहिणे या भागात पहिल्या वाक्यात करता व सहकारी क्रियापद यात सहसंबंध नसतो म्हणून कर्त्याच्या लिंग वचनानुसार am is are do does have hasहे हि क्रियापदे वापरावीत तर यातील दुसऱ्या वाक्यात क्रियापदाचे तिसरे रूप क्रियापदाला ing आहे किंवा क्रियापदाला s es प्रत्यय दिलेला नसतो तो कर्तयानुसार व काळानुसार लिहावे
7) संबंधित शब्द लिहा यात एका शब्दाशी संबंधित adverb किंवा adjective लिहायची असतात.
8) कम्प्लिट द वर्ड चैन यात अंताक्षरी प्रमाणे दिलेल्या शब्दा च्या शेवटच्या अक्षराने जर दिलेला शब्द नाम असेल तर पुढील शब्दांची सुरुवात नामाने करावी अशा रीतीने प्रत्येक शब्दा नंतर येणाऱ्या शब्दाची सुरुवात अगोदरच्या शेवटच्या अक्षराने करावी.
प्रश्न पहिला ब यात एकूण तीन ऍक्टिव्हिटी असतात। …………..
1 ) दिलेली इंग्रजी वाक्य प्रचार किंवा म्हण स्वतःच्या वाक्यात वापरणे यासाठी या वाक्प्रचाराचा अर्थ समजून should would could अशा साहाय्यकारी क्रियापदांचा वापर करून वाक्य लिहावे.
2 ) यात सफिक्स किंवा प्रीफिक्स वापरून नवीन शब्द तयार करावे लागतात व एक मूळ शब्द मनाने तयार केलेल्या वाक्यात वापरावयाचा असतो.
3) यात नवीन गौण वाक्य जोडून दिलेले वाक्य वाढवावयाचे असतात यासाठी wh शब्दांचा वापर करावा.
रायटिंग स्किल प्रश्न 5 A) यात पत्रलेखन करायचे असते संपूर्ण पत्र डाव्याबाजूने लिहावे पत्रात जर काल्पनिक नाव दिले असेल तर ते वापरावे नेहमी (इन्फॉर्मल पत्र )अनौपचारिक पत्र लिहिण्याचा प्रयत्न करावा पत्राचा विषय समजून व्याकरणदृष्ट्या अचूक पत्र लिहा प्रश्न5) B – यात डायलॉग राइटिंग साठी a b. C. अशा तीन कृती दिलेल्या असतात .
a) मध्ये चार वाक्यांचा योग्य क्रम लिहा.
b) यात उर्वरित संवाद पूर्ण करा.
c) यात दिलेल्या प्रसंगावर तीन-तीन संवाद लिहायचे असतात………
याला पर्यायी …OR… असलेल्या भागात स्पीच ड्राफ्टिंग करावी लागते भाषणाची सुरुवात मुख्य विषयाची मांडणी प्रवाही भाषा व शेवट चांगल्या रीतीने करा .समोरच्या व्यक्तीला उद्देशून बोलत आहात अशी भाषा वापरावी लागते भाषण लिहिताना त्यात कोटेशन .स्लोगन .इंग्रजी वाक्प्रचार म्हणी यांचा योग्य ठिकाणी वापर करा व वापरलेल्या वाक्प्रचार म्हणींना अधोरेखित करा. ……………………
प्रश्न क्रमांक 6 A. मध्ये दोन इंफॉर्मेशन ट्रान्सफर दिल्या जातात यात दिलेल्या माहितीवरून ट्री डायग्रॅम किंवा टेबल पूर्ण करावयाचा असतो. माहितीचे स्पष्टीकरण करताना दिलेल्या उदाहरणांचा वापर करा. माहितीचा लॉजिकल ऑर्डर कायम ठेवा ……….
प्रश्न 6B). … यात एक्सपान्शन ऑफ इडिया मध्ये म्हणी ,बातमी अहवाल ,किन्वा गोष्ट लिहिणे एखाद्या व्यक्तीची,, ठिकाणाचे,, परिस्थितीचे वर्णन लिहा असे पर्याय विचारलेले असतात. त्यासाठी त्या वाक्प्रचाराचा सोप्या भाषेत स्पष्टीकरण करा ..वेगवेगळी उदाहरणे द्या.. शीर्षक द्या ..न्यूज रिपोर्ट किंवा बातमी अहवाल लेखन करताना, डेटलाइन ,छोटा प्यारेग्राफ व संपूर्ण बातमी तसेच माहिती पुरविणारे याँचा उल्लेख करा..
प्रश्न 7A ). लाईव्ह इंग्लिश एक्टिविटी यात वेगवेगळ्या पदार्थ, वस्तूंवरील वेस्टने किंवा रेफर तसेच लीफलेट, फॉर्म फिल्लींग,, एडवर्टाइजमेंट , रिव्यू ऑफ बुक , टीव्ही शो ,यापैकी एक कृती दिलेली असते फॉर्म फिल्लींग साठी काल्पनिक व्यक्तीची माहिती लिहा स्वतःची माहिती भरू नका योग्य तेवढी व सखोल माहिती लिहिण्याचा प्रयत्न करा . …….
प्रश्न 7 वा B ). ट्रान्सलेशन यात a b c दिलेल्या वाक्याचे भाषांतर आपल्या मातृभाषेत करावे. यात वाक्प्रचार व म्हणी असतील तर त्या वाक्प्रचार व म्हणी आपल्या भाषेत परंपरेनुसार लिहावीत. शब्दशः भाषांतर टाळावे व आशया नुसार इंग्रजी भाषांतर करावे..

प्रा.मिलींदसर बडगुजर यांनी १०वी इंग्रजी ची प्रश्नपत्रीका सोडवणे बाबत केलेले मार्गदर्शन नक्कीच उपयुक्त असून त्याचा फायदा परिक्षार्थींनी घेतला असणार,अश्या प्रकारचे मार्गदर्शन बडगुजर समाजातील १०वी/१२वी चे विविध विषय शिकविणा-या अध्यापकांनी केलेस निश्चितच फायदेशीर ठरणार आहे.
प्रा.मिलींदसर बडगुजर यांनी १०वी इंग्रजी ची प्रश्नपत्रीका सोडवणे बाबत केलेले मार्गदर्शन नक्कीच उपयुक्त असून त्याचा फायदा परिक्षार्थींनी घेतला असणार,अश्या प्रकारचे मार्गदर्शन बडगुजर समाजातील १०वी/१२वी चे विविध विषय शिकविणा-या अध्यापकांनी केलेस निश्चितच फायदेशीर ठरणार आहे