
▪ इंटरव्ह्यू घेणारे बरेच प्रश्न विचारत असतात आणि अशावेळेस ज्या प्रश्नांची उत्तरे माहिती असतील त्यांचीच उत्तरे द्या, एखाद्या प्रश्नाचे उत्तर माहिती नसेल तर खोटे काही उत्तर देऊ नका.
▪ इंटरव्ह्यूमध्ये असताना कधीही तुमच्या आधीच्या कंपनीवर टीका करू नका किंवा आधीच्या बॉसला नावे ठेवू नका.
▪ तुम्हाला जॉबची किती गरज आहे हे बोलणे टाळा. इंटरव्ह्यूमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांवर फोकस ठेवा.
▪ इंटरव्ह्यूमध्ये असताना कधीही विनोद किंवा वाईट भाषा टाळा, तुमच्या मित्रांशी गप्पा मारता तसे बोलू नका.
▪ सगळ्यात महत्वाचे म्हणजे इंटरव्ह्यू घेणारा जर ओळखीचा असेल तर तुमचे वागणे हे फक्त इंटरव्ह्यूशी संबंधित असणे फार गरजेचे ठरते. अशावेळी कुठेही एकेरी बोलणे किंवा कॅज्युअल वागणे ठेवू नका.

Leave a Reply