कुर्हे पानाचे येथे नवनिर्वाचित चामुंडा माता महिला मंडळाची मासिक सभा

आज दिनांक 19 फेब्रुवारी रोजी कुर्हे पानाचे तालुका भुसावळ येथे विठ्ठल मंदिरात दुपारी 3 वाजता नवनिर्मित चामुंडामाता महिला मंडळाची मासिक सभा पार पडली.
या सभेसाठी प्रमुख पाहुण्या म्हणून भुसावळ येथील जनजागृती महिला मंडळाच्या अध्यक्ष सौ. लता प्रदीप बडगुजर उपस्थित होत्या. गावातील चामुंडा माता महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.आरती स्वानंद बडगुजर, उपाध्यक्षा सौ.संगीता मनोज बडगुजर व सचिव सौ. नलिनी आत्माराम बडगुजर यांच्यासहीत अनेक महिला हजर होत्या.
या बैठकीत सौ. लताताईंनी पारोळा येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय महिला मेळाव्यात झालेल्या सामाजिक जुन्या चालीरीती बंद करण्याविषयी ज्या महिला मेळाव्याला येऊ शकल्या नाहीत त्यांना मार्गदर्शन करून अनेक सामाजिक विषयावर चर्चा करण्यात आली. तसेच सौ. लताबाई बडगुजर यांनी महिला एकत्रिकरण, बचत गट सुरू करणे, महिला उद्योग सुरू करणे, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करणे याविषयी सुध्दा माहिती दिली. महिला मंडळाची स्थापना झाल्यामुळे महिला वर्गात आनंदाचे वातावरण होते. तसेच लोकेश कोतवाल यांनी बडगुजर वेब पोर्टल आणि ऍपची माहिती दिली
या बैठकीला कुर्हे गावचे सरपंच श्री.रामलाल बडगुजर ,श्री.गोपाळ बडगुजर,श्री.प्रदीप बडगुजर, श्री. स्वानंद बडगुजर, बडगुजर प्राऊड ग्रुपचे धडाडीचे युवा कार्यकर्ते लोकेश कोतवाल हजर होते.

लोकेश कोतवाल वेब पोर्टलविषयी मार्गदर्शन करतांना
सौ. लताताई प्रदिप बडगुजर महिलांना मार्गदर्शन करतांना

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*