दि. 31 जुलै 2026, नवी दिल्ली महाराष्ट्रातील 27 ओबीसी जातींच्या केंद्राच्या यादीतील समावेशासाठी दिल्लीत जोरदार पाठपुरावा

दिनांक: 31 जुलै 2026, नवी दिल्ली

महाराष्ट्रातील 27 ओबीसी जातींच्या केंद्राच्या यादीतील समावेशासाठी दिल्लीत जोरदार पाठपुरावा
महाराष्ट्र ओबीसी कृती समिती व बडगुजर समाज चामुंडा माता मिशनचा तीन दिवसीय दिल्ली दौरा यशस्वी

नवी दिल्ली: केंद्राच्या ओबीसी यादीत प्रलंबित असलेल्या महाराष्ट्रातील 27 ओबीसी जातींच्या समावेशासाठी महाराष्ट्र ओबीसी कृती समिती आणि बडगुजर समाज चामुंडा माता मिशनच्या शिष्टमंडळाने 29 ते 31 जुलै 2026 या कालावधीत नवी दिल्ली येथे व्यापक पाठपुरावा केला.

या दौऱ्यात शिष्टमंडळाने विविध केंद्रीय मंत्री, खासदार, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे पदाधिकारी आणि वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन निवेदने सादर केली.

दौऱ्याचा आढावा
29 जुलै: केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री श्री. बी. एल. वर्मा, डॉ. भागवत कराड, लोकसभा ओबीसी कल्याण समितीचे अध्यक्ष डॉ. गणेश सिंह, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या सदस्या श्रीमती किरण महल्ले, केंद्रीय राज्यमंत्री श्री. रामदास आठवले, खासदार श्री. हेमंत सावरा आणि खासदार श्री. अमर काळे यांची भेट घेऊन ओबीसी समाजाच्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा झाली. यावेळी आमदार श्री. परिणय फुके उपस्थित होते.

30 जुलै: सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीला संयुक्त सचिव डॉ. प्रवीण कुमार थिंड (IAS), संचालक – ओबीसी विभाग श्री. गौरव सिंह राजावत (IAS) उपस्थित होते. 27 ओबीसी जातींच्या समावेशासाठी Cabinet Note तयार करून प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.
त्यानंतर NCBC सदस्या श्रीमती किरण महल्ले, सल्लागार श्री. राजेश यादव, खासदार श्रीमती प्रतिभा धानोरकर आणि केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांची भेट घेण्यात आली.
सायंकाळी केंद्रीय राज्यमंत्री श्री. रामदास आठवले यांनी शिष्टमंडळाला सहभोजनासाठी आमंत्रित करून सकारात्मक भूमिका दर्शवली.

31 जुलै: खासदार श्री. अशोक चव्हाण आणि श्री. विनोद तावडे यांची भेट घेऊन केंद्रीय सामाजिक न्याय मंत्र्यांची लवकर भेट घेण्याचे आश्वासन मिळाले.

शिष्टमंडळ
या दौऱ्यात डॉ. नामदेव राऊत, श्री. श्रावण फरकाडे,बडगुजर समाज राष्ट्रीय ओबीसी कमेटी चेअरमन, मा. प्राचार्य श्री. पी. आर. बडगुजर, सर *श्री. एस. एम. बडगुजर – व्हाईस चेअरमन, बडगुजर समाज चामुंडा माता मिशन संस्थापक अध्यक्ष- श्री. नरेंद्र रामदास बडगुजर,ब. स. चामुंडा माता मिशन अध्यक्ष – श्री. अनंत रूपचंद बडगुजर यांच्यासह नागपूर, पुणे, नांदेड, जळगाव, मुंबई इत्यादी भागांतील 27 जाती समूहांचे सुमारे 40 प्रतिनिधी सहभागी झाले.

महाराष्ट्र ओबीसी कृती समितीने स्पष्ट केले की, 27 जातींचा केंद्राच्या ओबीसी यादीत समावेश होईपर्यंत पाठपुरावा सुरू राहील.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

*