पुणे : बडगुजर समाज बहुउद्देशीय संस्था, पुणे यांच्या कार्यकारिणीची बैठक दि. ३१ मे २०२६, रविवार रोजी सायंकाळी ५ वाजता स्वारगेट येथील श्री भगवान दत्तात्रय बडगुजर यांच्या कार्यालयात उत्साहात संपन्न झाली. संस्थेचे पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत संस्थेच्या भविष्यातील उपक्रमांबाबत अनेक महत्त्वाचे निर्णय सर्वानुमते घेण्यात आले.
बैठकीतील ठळक ठराव: 1. समाज स्नेह मेळावा व बडगुजर समाचार अंक प्रकाशन दि. १५ ऑगस्ट २०२६, स्वातंत्र्य दिनी भव्य ‘बडगुजर समाज स्नेह मेळावा’ आयोजित करण्याचा निर्णय झाला. याच दिवशी ‘बडगुजर समाचार’ या विशेष अंकाचे प्रकाशनही होणार आहे. अंकासाठी समाजातील सुजाण नागरिक, युवक-युवतींनी लेख, कविता व साहित्य पाठवावे, असे आवाहन मंडळाने केले आहे.
2. बडगुजर समाज पुस्तिका पुणे-पिंपरी चिंचवड परिसरातील समाज बांधवांची माहिती एकत्रित करण्यासाठी संस्थेने गुगल फॉर्म लिंक तयार केली आहे. ही लिंक लवकरच प्रसारित होईल. सर्व समाज बांधवांनी दि. १५ जुलै २०२६ पर्यंत फॉर्ममध्ये संपूर्ण माहिती भरावी. संकलित माहितीच्या आधारे ‘बडगुजर समाज पुस्तिका’ १५ ऑगस्ट २०२६ रोजी प्रकाशित केली जाईल.
3. वारकरी सेवा दि. ९ जुलै २०२६ रोजी पंढरपूरकडे निघणाऱ्या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकरी भाविकांसाठी चहा, बिस्कीट, पाणी व नाश्त्याची सेवा करण्याचा ठराव झाला. पिंपरी-चिंचवड परिसरातील समाज बांधवांनी आर्थिक व श्रमदानातून या सेवेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.
4. निमंत्रित सदस्य व सल्लागार निवड संस्थेच्या कार्यकारिणीवर खालील समाज बांधवांची ‘निमंत्रित सदस्य’ म्हणून निवड झाली: 1. सौ. सारिका ताई पवार – पूर्णा नगर, चिंचवड 2. श्री. अरुण चुडामन शेठ बडगुजर – आळंदी 3. श्री. प्रशांत कमलाकर बडगुजर – पिंपळे निलख 4. श्री. दीपक प्रभाकर बडगुजर कोटवे – रहाटणी 5. श्री. गोविंद ईश्वर बडगुजर – तळेगाव 6. सौ. वंदना ज्ञानेश्वर बडगुजर – वाकड याशिवाय श्री. राजेंद्र डोभा शेठ बडगुजर यांची संस्थेचे ‘सल्लागार’ म्हणून एकमताने निवड करण्यात आली. संपूर्ण बैठक खेळीमेळीच्या व आनंदी वातावरणात पार पडली. नव्याने निवड झालेल्या सदस्यांचे उपस्थित पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले. – बडगुजर समाज बहुउद्देशीय संस्था, पुणे

Leave a Reply