जळगांव येथील श्री. रामलाल तुकाराम बडगुजर (ग्रामविकास अधिकारी) व स्व. सौ. मंगला रामलाल बडगुजर यांचे चिरंजीव श्री स्वप्निल रामलाल बडगुजर यांना 🏆डॉ. एपीजे अब्दुल कलाम राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार 2026 देऊन सन्मानित करण्यात आले. वसूनंदिनी फाउंडेशन, जामनेर आयोजित राष्ट्रीय प्रेरणा, राष्ट्रीय जीवन गौरव तसेच विविध सामाजिक आणि वैयक्तिक राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा 2026 हा अल्पबचत भवन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव दिनांक 5 एप्रिल 2026, रविवार रोजी पार पडला त्यात डॉ. एपीजे अब्दुल कलाम राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार 2026 हा श्री स्वप्निल रामलाल बडगुजर यांना देण्यात आला. श्री स्वप्निल रामलाल बडगुजर यांनी आपल्या गायनद्वारे समाजकार्य आणि त्यासाठी घेतलेले अथक परिश्रम यांची दखल घेऊन वसुनंदिनी फाउंडेशन जामनेर तर्फे हा पुरस्कार त्यांना देण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. संजयजी चौधरी (ज्येष्ठ साहित्यिक नाशिक) यांची प्रमुख उपस्थिती तसेच प्रमुख पाहुणे म्हणून प्रसाद निशानदार (प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र ब्राह्मण सभा समन्वयक ब्रह्म श्री परिवार जळगाव) मा. कामिनी अमृतकर (संत साहित्यिका चाळीसगाव), महेश कुलकर्णी (संचालक महेश एंटरप्राईजेस छत्रपती संभाजी नगर) ,श्री विद्याधर सोनवणे सर (वसुनंदिनी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष) आणि सौ माधुरी कुलकर्णी (वसूनंदिनी फाउंडेशन संस्थापिका सचिव) इत्यादी उपस्थित होते.
श्री स्वप्निल रामलाल बडगुजर – 99753 60747



अभिनंदन आणि शुभेच्छा!
मा. स्वप्नील बडगुजर यांचे कार्य प्रेरणादायी आहे.