पुण्याच्या शिवानी बडगुजरची अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपनी ‘IBM’ मध्ये ‘UX डिझाइनर’ म्हणून निवड!

पुणे: गेल्या २० वर्षांपासून पुण्यात स्थायिक असलेली कु. शिवानी गोकुळ बडगुजर हिची नामांकित अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपनी ‘आयबीएम’ (IBM) मध्ये ‘यूएक्स डिझाइनर’ (UX Designer) म्हणून निवड झाली आहे. अत्यंत कठीण स्पर्धा परीक्षा आणि कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतलेल्या पॅनेल इंटरव्ह्यूच्या फेऱ्या यशस्वीपणे पार करून शिवानीने हे यश संपादन केले आहे. ती बेंगळुरू येथे ‘आयबीएम’च्या कार्यालयात रुजू झाली आहे.

शैक्षणिक पार्श्वभूमी

शिवानी सध्या एमआयटी इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन (MIT ID), पुणे येथून आपल्या ‘मास्टर ऑफ डिझाइन’ (M.Des) अभ्यासक्रमाच्या अंतिम सत्रात आहे. तिने आपले पदवीचे शिक्षण (B.Des) सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन, पुणे येथून पूर्ण केले आहे.

कौटुंबिक पार्श्वभूमी आणि मार्गदर्शन

शिवानीचे वडील श्री. गोकुळ बडगुजर हे अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपनी ‘कारगिल इंडिया लिमिटेड’ मधून प्लांट ऑपरेशन्स हेड आणि संचालक पदावरून निवृत्त झाले आहेत, तर आई सौ. स्वाती बडगुजर गृहिणी आहेत. शिवानीला या यशासाठी तिचा मोठा भाऊ पुष्कर बडगुजर (व्हीपी, जे.पी. मॉर्गन चेस कंपनी, मुंबई) आणि वहिनी पूजा (मॅनेजर, तक्षशिला कन्सलटंट्स) यांचे मोलाचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.

Shivani Gokul Badgujar, Pune

शुभेच्छांचा वर्षाव

शिवानीच्या या दैदिप्यमान यशाबद्दल तिचे आजोबा श्री. बी. डी. पवार (निवृत्त कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण) आणि आजी सौ. आशालता पवार (मालेगाव) यांनी तिला आशीर्वाद दिले आहेत.

तसेच तिचे काका श्री. शिवाजी बडगुजर (निवृत्त सीनिअर जीएम, जॉन डिअर ट्रॅक्टर्स, पुणे), मामा श्री. पंकज पवार (ह्युस्टन, अमेरिका), श्री. वैभव पवार (टोरंटो, कॅनडा), मावशी सौ. समिता आणि मावसा श्री. किशोर बडगुजर (मस्कत, ओमान) यांनी शिवानीचे अभिनंदन करून तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

2 Comments

Leave a Reply to Dharmendra Popatrao Badgujar Cancel reply

Your email address will not be published.


*