श्री भगवान डोंगर बडगूजर (सर), पनवेल सेवानिवृत्त

श्री भगवान डोंगर बडगूजर अर्थात भगवान शेठ, बडगूजर सर हे नाव समाजात आणि पनवेल तसेच अन्यत्र परिचित आहे. अमळनेर तालुक्यातील प्रगणे डांगरी येथे जन्मलेले श्री भगवान डोंगर बडगूजर यांनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत संघर्ष करीत यशोशिखर गाठले. त्यांचे आई वडील शेतमजुरी करत होते. ग्रामीण भागातून येत श्री भगवान सर यांनी मुंबईच्या चेंबूर येथील नामवंत विद्यालयात तब्बल ३२ वर्षे विद्यादान केले. १९९३ पासून सुरू केलेली सरस्वतीची उपासना ३१ मे २०२५ रोजी सन्मानाने निवृत्तीच्या रूपाने झाली. सेवेतून निवृत्ती स्वीकारली असली तरी विद्यार्थ्याना मार्गदर्शन अखंड सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार भगवान सरांनी व्यक्त केला आहे.

आई वडिलांची प्रेरणा दिवंगत बंधु दिलीप यांचे सहाय्य यामुळे भगवान सरांनी यशोशिखर गाठले. सहचरणी संगीता यांची मोलाची साथ आणि मुलगा कुणाल याचे पाठबळ यामुळे भगवान सरांनी आपला संघर्ष सुखात रूपांतरित केला.

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुका विविध कारणांमुळे देशभरात प्रसिद्ध आहे. अमळनेर हे शहर संत सखाराम महाराज ह्यांची ही कर्मभूमी आहे. दानशूर श्रीमंत प्रताप शेठ यांचे कार्य, अझीम प्रेमजी यांच्या वडिलांनी अमळनेरात विप्रोची केलेली सुरुवात. थोर विचारवंत साने गुरुजी यांचे अमळनेर येथे वास्तव्य, मंगळ महाराज यांचे देवस्थान यामुळे अमळनेरचा नावलौकिक मोठा आहे. शैक्षणिक, धार्मिक, वारसा असलेल्या अमळनेर तालुक्यातील डांगरी येथील श्री. उत्तमराव पाटील, सौ.लिलाताई पाटील, श्री.शिवाजीराव गिरधर पाटील यांचे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात भरीव योगदान दिले होते. अशा या तालुक्याने अनेक नामवंत व्यक्तिमत्व दिले. त्यांच्या कार्याची प्रेरणा घेत नवी पिढी वाटचाल करत आहे.

याच अमळनेर तालुक्यातील प्रगणे डांगरी येथे जन्मलेले श्री भगवान डोंगर बडगूजर यांनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत संघर्ष करीत यशोशिखर गाठले. श्री. भगवान डोंगर बडगुजर अर्थात भगवान सर, भगवान शेठ, बडगूजर सर अशा नावांनी भगवान सरांची ओळख आहे.

भगवान सरांचे प्राथमिक शिक्षण अमळनेर तालुक्यातील प्रगणे डांगरी या ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल येथे त्यांनी पूर्ण केले तर उच्च माध्यमिक आणि पदवी शिक्षण त्यांनी प्रताप कॉलेजमध्ये पूर्ण केले. त्यानंतर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात त्यांनी बीएड ही अध्यापनाची पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी नोकरीसाठी थेट मुंबई गाठले.

नवीन पनवेल अर्थात नवी मुंबई येथील निवासी असलेले भगवान सर यांनी एकाच वेळी दोन ठिकाणी अध्यापनाचे काम केले त्यात त्यांनी गरीब विद्यार्थी सहाय्यक मंडळ यांच्या आमची शाळा येथे तब्बल 32 वर्षे सेवा बजावली. चेंबूर येथीलच महाराष्ट्र नाईट हायस्कूलचे मुख्याध्यापक या रात्र शाळेत त्यांनी काही काळ अध्यापनाचे कार्य केले.

कोरोना काळात त्यांनी जिवाची पर्वा न करता शेकडो जनाना मदत केली. त्यामुळे त्यांना कोरोंना योद्धा म्हणून गौरवले गेले. शाळेत शिकवताना त्यांनी चतुरस्त्र कामगिरी केली विविध विषयात रुची दाखवली. पर्यावरण, क्रीडा, स्वच्छता असो त्यात त्यांनी आपली कर्तबदारी दाखवली. या निमित्त त्यांना अनेक पुरस्कार आणि सन्मान प्राप्त झाले आहेत. त्यातूनच देश विदेशातील मान्यवर यांच्याकडून सन्मान आणि संवाद त्यांनी साधला आहे.

महाराष्ट्र नाईट हायस्कूलचे मुख्याध्यापक असताना भगवान सरांच्या मार्गदर्शनाखाली दादर चौपाटी येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. स्वच्छता अभियान, पर्यावरणपुरक उपक्रम राबविल्याने निसर्ग मंडळात तिसरा क्रमांक मिळाला.

सामाजिक सेवेचा पगडा त्यांच्या मनावर फार मोठा रुजलेला आहे त्यातूनच ते एक फार मोठे समाजसेवक म्हणून उदयास आलेले आहेत. परमस्नेही, मनमिळाऊ व्यक्तिमत्व अशी त्यांची ख्याती आहे. भगवान सरांचा स्वभाव मनमिळाऊ असल्याने त्यांचे स्नेही सर्वत्र आहेत. लोकल रेल्वेतल्या प्रवाशांनी त्यांना मानपत्र देत विशेष सत्कार केला.

भगवान सरांनी ज्या गरीब विद्यार्थी सहाय्यक मंडळाच्या आमची शाळा मध्ये 1993पासून मुख्याध्यापिका सौ नीलिमा विकास करमळकर यांच्या मार्गदर्शनाखाली
निरंतर सेवा बजावली तर विद्यमान मुख्याध्यापिकासौ प्रियंका ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या हस्ते त्यांचा सेवानिवृत्ती निमित्त सह कुटुंब यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांचे सहकारी आणि विद्यार्थी सारेच भावुक झाले होते.

सेवा निवृत्ती किंवा रिटायरमेंट काहीही म्हणा
आयुष्यभर संघर्ष केला आता आरोग्य सांभाळून
यापुढे जीवनात येणारा प्रत्येक क्षण
तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे जगा.
तुमच्या सोबत तुमच्या सौ संगीता यांना वेळ द्या.


शुभेच्छांसाठी आपण संपर्क करू शकता श्री. भगवान डोंगर बडगुजर (सर) पनवेल +91 9869046992

गरीब कुटुंबातून पुढे आलेले व स्वकर्तृत्वावर आजपर्यंत मजल मारलेले श्री. भगवान बडगुजर (सर) यांना पुढील आयुष्य सुख समाधानाचे जावो व त्यांचे हातून समाजकार्य घडो अशी अपेक्षा ठेवून त्यांना सेवानिवृत्ती निमित्त आपणा सर्वांतर्फे हार्दिक शुभेच्छा…

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*