धरणगांव येथील श्री कुलस्वामिनी चामुंडा माता मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा दि. दि. २०-०४-२०२५ रोजी भक्तीमय व भव्य दिव्य स्वरूपात संपन्न झाला. यावेळी श्री कुलस्वामिनी चामुंडा माता मंदिर लोकार्पण सोहळा मा. ना. भाऊसो श्री गुलाबरावजी रघुनाथ पाटील ( पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री व पालकमंत्री जळगांव) यांच्या शुभहस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष अखिल भारतीय बडगुजर समाज महासमितीचे अध्यक्ष श्री. सुरेश शिवराम महाले यांना देण्यात आले. प्रथम श्री कुलस्वामिनी चामुंडा मातेच्या फोटोचे पुजन करून दीपप्रज्वलन केले व इतर मान्यवरच्या हस्ते सुध्दा दीपप्रज्वलन करण्यात आले. मंचावरील सर्व तिन्ही राज्यांतून आलेले प्रमुख अतिथी, प्रमुख मान्यवर यांचाही गुलाबपुष्प, शाल व मराठी पुस्तक देऊन सत्कार करण्यात आले. त्यावेळी अखिल भारतीय बडगुजर समाज मंडळ कडुन मा. ना. भाऊसो श्री गुलाबरावजी रघुनाथ पाटील ( पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री व पालकमंत्री जळगांव) यांना गुजर बडगुजर समाज आर्थिक विकास महामंडळात बडगुजर समाजाला प्रतिनिधित्व मिळावे म्हणून अखिल भारतीय बडगुजर समाज महासमितीच्या वतीने निवेदन ही देण्यात आले. व त्याचा गुलाबपुष्प देऊन सत्कार ही सत्कार करण्यात आला. अखिल भारतीय बडगुजर.समाज महा समिती अध्यक्ष मा.श्री. सुरेश शिवराम शेठ महाले.रा.भुसावल.यांच्याकडून धरणगांव येथील चामुंडा माता मंदिरास ११०००/- रू. देणगी दिली. बहुउद्देशीय बडगुजर समाज मंडळ पिंप्री यांनीही रु.७१००/- देणगी दिली व दिहीचा मंडळातील सर्व सदस्य यांचा शाल व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. जळगांव लोकसभा खासदार मा. सौ. स्मिताताई वाघ यांनीही कुलस्वामिनी चामुंडा मातेचे दर्शन घेऊन मंडळातील कार्यकर्तेव महिला भगिनी यांच्याशी भेट घेतली. कुलस्वामिनी चांमुडा माता मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा दिनांक २० एप्रिल २०२५ रविवार रोजी श्री. हेमंत दत्तात्रय पाठक (ब्रम्हवृद) यांच्या मार्गदर्शनाखाली श्री राजेंद्र काशिनाथशेठ बडगुजर व सौ. आशाबाई राजेंद्र बडगुजर यांच्या हस्ते संपन्न झाले. प्राणप्रतिष्ठा,
मुख्य हवन कुंड पुजा,
कळस व ध्वजारोहण,
श्री. गणेशजी प्राणप्रतिष्ठा ,
श्री कुलस्वामिनी श्री चामुंडा माता आरती व नैवेद्य व महाप्रसाद
महाप्रसाद अन्नदाता :-
श्री. मनोहर गंगाराम बडगुजर
(अध्यक्ष समस्त बडगुजर समाज, धरणगांव) श्री इंजि. रोहित मनोहर बडगुजर ( कॉन्ट्रॅक्टर)
Leave a Reply