मी वसुंधरा
म्हणतात मला वसुंधरा
शिरी वाहते मी भारा
सोसते सदा ऊन वारा
कधी झेलते जलधारा
वारा वाहतो अवखळ
झाडांना मी देते बळ
माझ्यावरती फुल फळ
डोंगरपर्वताची माळ
पशु पक्षी मानव प्राणी
जिव जंतू सांभाळूनी
तकी सागराचे पाणी
नया वाहती वेगानी
धान्य पिकविते सारी
खनिज तेलं ही अंतरी
फ्लॅट बंगले उंच भारी
उद्योग धंदे माझ्यावरी
सहनशिल मी क्षमाशिल
कार्य माझे अनमोल
फीरते मी गोल गोल
आहे मुकी अन् अबोल
उपकारांची ठेवा जाण
नम्रपणे फेडा ऋण
हरवा माझे प्रदूषण
हे पदरात यावे दान
पाणी जिवा माझेवर
वने होतील सुंदर
हिरवा शालू अंगावर
हा द्यावा मला पुरस्कार
राष्ट्रीय वसुंधरा दिन
बावीस एप्रिल हा जाण
झाडे लावून जगवून
घ्यावा साजरा करून
कवी :-
श्री. निंबा पुना बडगुजर, एरंडोल
भ्रमण ध्वनी – 96370 79688




माननीय कवी श्री निंबा पुना बडगुजर यांची छान प्रबोधन करणारी कविता! काव्य आवडले.