🌷 गुढी 🌷
नववर्ष हे आले
घेऊन सुखदुःखाचे नगारे
नेहमीचे हे इशारे
नवीन नाही न्यारे
नववर्ष हे आले
उभारु नवी गुढी तोरणे
नेहमीची जरी धोरणे
करु सुरुवात नव्याने
नववर्ष हे आले
घेऊनी सोनेरी किरणे
नेहमीचे ही झळाळी असणे
फेडू अंधःकाराचे पारणे
नववर्ष हे आले
हर्ष आनंद घेऊनी
चैत्राची पालवी लेवूनी
चला उत्कर्षाची उभारु गुढी
नववर्ष हे आले
घेऊनी नवी पहाट
काय तिचा नवा थाट
वाहे आनंदाचा पाट
नववर्ष हे आले
घेऊनी सुगंधाचा घमघमाट
लोपवू तो दुःखाचा थयथयाट सुखाची चालूया वाट.
✒️ कवी विभास/ कैलास विमल भाऊलाल बडगुजर टिटवाळा
भ्रमणध्वनी : 8888284265
✳️✳️✳️✳️✳️✳️


Leave a Reply