शेतकऱ्यांच्या आत्महत्या – कवी श्री. निंबा पुना बडगुजर, एरंडोल

शेतकरी अन कास्तकार
हरीत क्रांतीचा कलाकार
नैसर्गिक आपत्ती वारंवार
शासकीय योजनांपासून दूर

उन पावसात करतो काम
रात्रंदिन गाळतो घाम
काळ्या मातीवर त्याचे प्रेम
उत्पन्न काढण्या राही ठाम

त्याचा निसर्गावर ताल
सदा होती त्याचे हाल
मालास नसे कधी मोल
दलाल होती मालामाल

सदा सर्वदा शेतीत व्यस्त
माल विकतो मात्र स्वस्त
नेहमी राही चिंताग्रस्त
सर्व परिवार दिसे त्रस्त

वाढत्या लोकसंखेचा भस्मासूर
त्यात महागाईचा उभा डोंगर
कुणीही देईना त्यास धीर
सावकार पाश कर्ज बाजार

घरांत वातावरण अशांत
कुणीही देईना त्यास मदत
मग जगण्याची नसे हिमंत
निरस जिवनाचा करतो अंत

शेतकरी सुखी तर जग सुखी
या कोरडया गप्पाच मुखी
ह्या कास्तकार शेतकऱ्यांच्या व्यथा
शेवटी ठरतात पुस्तकांच्याच कथा

कवी :-
श्री. निंबा पुना बडगुजर, एरंडोल
भ्रमण ध्वनी – 96370 79688

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*