डॉ. आदिती बडगुजर M.B.B.S. परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण – श्री. योगेश जाधव सर, चोपडा

पुणे: बोराडी ह. मु. वापी येथील कु. डॉ. आदिती रविंद्र शेठ बडगुजर यांनी Bharti Vidyapeeth Deemed University मेडिकल कॉलेज, सांगली येथून M.B.B.S. परीक्षेत प्रथम श्रेणीत यश संपादन केले आहे.

डॉ. आदिती या लहानपणापासूनच चुणचुणीत आणि हुशार होत्या. शालेय जीवनातही त्यांनी दहावी आणि बारावीमध्ये उज्ज्वल यश मिळवले होते. आपल्या यशाचे श्रेय आई-वडिलांच्या प्रेरणा व मार्गदर्शनाला देत, “त्यांच्या पाठिंब्यामुळेच हे स्वप्न साकार झाले,” अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

त्यांचे वडील श्री. रविंद्र जगन्नाथशेठ बडगुजर आणि आई सौ. वंदना रविंद्रशेठ बडगुजर यांनी त्यांच्या यशाचा आनंद व्यक्त करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. वैद्यकीय क्षेत्रात अधिक मोठे यश मिळवण्याचा संकल्प करत, डॉ. आदिती यांनी समाजासाठी योगदान देण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

त्यांच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत असून व अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, मोहकर परिवार, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹

5 Comments

  1. खूप खूप अभिनंदन डॉ आदिती पुढील वाटचालीस शुभेच्छा

Leave a Reply

Your email address will not be published.


*