महागाईवर मात
जगण्यासाठी एकच उपाय
अंथरूण पाहून पसरावे पाय ।। धृ ।।
सर्वांच्याच मुखी महागाई महागाई तात्पुरता विरोध मग सवय होत जाई वाढला पगार तो पुरतच नाय, अंथरूण पाहून पसरावे पाय ।। १ ।।
वाढत्या गरजा त्यात व्यसनांची भर
हा फॅशनचा जमाना लक्ष मॅचिंगवर आवक पेक्षा जावक जास्त परवडेल काय, अंथरूण पाहून पसरावे पाय ।। २।।
कुणी बांधली सरी तर हेवा घरोघरी
ही स्पर्धा नाही बरी, ऐपत पहावी खरी नशिबाशिवाय सर्व झूठ हाय, अंथरूण पाहून पसरावे पाय ।। ३ ।।
कशाला पाहिजे बाहरेचं खाणं
घरातच बसून खाऊ सर्वजण
स्वस्त ते मस्त फास्ट फूडला बाय बाय, अंथरूण पाहून पसरावे पाय ।। ४।।
पती पत्नी दोघांत एकच अपत्य
सुखी संसाराचा मंत्र हा सत्य
कुटूंब कल्याण नसबंदी हा एकच उपाय, अंथरूण पाहून पसरावे पाय ।।५।।
अशीही महागाई सर्वानाच छळते
या नकली बाजारात सर्व काही मिळते मिळत नाही फक्त येथे, बाप आणि माय, अंथरूण पाहून पसरावे पाय ।।६।।
सततची महागाई माणूस बनला कोडगा
तरी सुध्दा सरकार काढत नाही तोडगा निंबा सांगतो मार्ग पण ऐकत कुणी नाय, अंथरूण पाहून पसरावे पाय ।। ७।।
जगण्यासाठी एकच उपाय
अंथरूण पाहून पसरावे पाय
कवी :-
श्री. निंबा पुना बडगुजर, एरंडोल
भ्रमण ध्वनी – 96370 79688


Leave a Reply