सान थोर अबालवृध्द
सर्वानाच मोबईल हवा
शहर खेडे वाड्या वस्तीत
या मोबाईलचीच हवा
वेळेचे ते बंधन कसले
ही तर चोवीस तास सेवा
हा ग्राहक मात्र अर्धपोटी
या कंपन्या खातात मेवा
नंबर पाहती डोळे याचे
श्रवण करीती कान
संदेश देई तोंड सदा
सर्व होतात देहभान
खोटे बोलणे अन लबाडी
तात्काळ हा शिकवितो
गाडी असो वा पायी
अपघात हाच घडवितो
कामापुरता वापर याचा
पण अति तेथे माती
मोबाईल शाप की वरदान
आहे मानवाच्या हाती
हे वेड आहे की व्यसन
का कळत कुणाला नाही
हा पैसे खाऊन सुध्दा
याचे पोट रिकामे राही
गरज नाही ना ऐपत
जे उगाच मारतात भाव
इनकमिंग ठेवा मोबाईल
तुम्हा निंबा सांगतो राव
कवी :-
श्री. निंबा पुना बडगुजर, एरंडोल
भ्रमण ध्वनी – 96370 79688



Leave a Reply