मद्यपान धुम्रपान
आयुष्याची धुळधाण
अनपेक्षित आलीस तू सोबतीला घेऊनी सह सिगार मदतीला
हळूवार स्पर्श करूनी जीवनांत तू आली लालसेने दररोज मैत्री घट्ट झाली
मटका जुगार पत्ते जडले संगतीला उशिरा समजले घातक हे प्रगतीला
दु.ख कुश विसरणेस तुज स्विकारावे पदरी निराशा मन सुन्नझाले
हतबल झालो भान ही हरपले वेळ गेल्यावर सर्व काही संपले
पुरेना पगार कुटुंब वाताहत झाले भविष्यातील योजनांना पार नष्ट केले
शरीर अस्थिपंजर रोगग्रस्त निर्बल झाले टी.बी. कर्कने ग्रासले धन द्रव्य ही नेले
गेली सामाजिक प्रतिष्ठा नातलग दूर गेले वरिष्ठांची मर्जी गेली मित्र ही शित्रू झाले
तु दारू ती सिगार तो मटका देऊन गेला हृदयास तिव्र झटका
मति गुंग झाली, सुचेना करावे काय आता अंधकारमय जीवन झाले, केवळ रडतात बालमाता
घ्या समजून वेळेवर द्या यांना मूठमाती नका सापडू जाळ्यात या ही निंबाची विनंती .
कवी :- लेखक :-
श्री. निंबा पुना बडगुजर, एरंडोल
भ्रमण ध्वनी – 96370 79688


Leave a Reply