आज गुजरात चे गृह मंत्री श्री. हर्ष संघवी यांनी गुजरातचे नामांकित उद्योजकांना प्रोत्साहित केले. त्यांत आपल्या बडगुजर समाजाचे शिर्ष उद्योजक श्री. सुरेश प्रेमराज शेठ बडगुजर व त्यांचे सुपुत्र श्री. विनीत सुरेश शेठ बडगुजर यांची निवड करण्यात आली. त्यांना प्रमाणत्र देउन सन्मानित करण्यात आले.

श्री. सुरेश प्रेमराज शेठ यांनी फारच कमी वर्षात ही उंची गाठली आहे. वडीलांचा प्लायवूड बिझनेस व्यतीरीक्त त्यांनी एश ब्लोक (बिल्डिंग मटेरियल) बनविण्याचे साहस केले. फारच कमी वेळात त्यांनी आपला हा निर्णय योग्य ठरवला. आज त्या सेक्टर मध्ये त्यांची कंपनी “ग्रीन मिरर बिल्डकोन प्रा. ली.” उंच स्थानी आरुढ आहे. श्री विनीत मध्ये सुध्दा त्याच्या वडिलांसारखा साहसी, तरबेज व त्वरित निर्णय घेण्याचे वांशिक गुण आढळतात.
श्री. सुरेश प्रेमराज शेठ बडगुजर व त्यांचे सुपुत्र श्री. विनीत सुरेश शेठ बडगुजर यांना मिळालेल्या सन्माना बद्दल आपले बडगुजर.इन टिम, अ. भा. ब. स. महा समिती, बडगुजर समाज बहुउद्देशीय संस्था पुणे व श्री. भगवान दत्तात्रेय बडगुजर यांचे कडून हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

Leave a Reply