जळगाव -महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल नुकताच दिनांक 27 में 2024 रोजी ऑनलाईन स्वरूपात जाहीर करण्यात आला. यामध्ये पिंप्राळा येथील रहिवासी व शहरातील प.न.लुंकड कन्या शाळा विद्यालयातील विद्यार्थिनी कु. साक्षी संदीप चव्हाण हिने सर्वाधिक 96.20% गुण मिळवून कन्या शाळेतून सर्वप्रथम येण्याचा बहुमान पटकाविला.सदर सुयशाचे श्रेय तिने आपल्या आई-वडिलांसह शाळेतील सर्व विषय शिक्षक वृंद यांना दिले आहे.दररोज 8 ते 10 तास अथकरित्या अभ्यास करून आत्यंत हालाकीच्या परिस्थितीतून तिने हे सुयश आपल्या जिद्द व चिकाटीने संपादन केले आहे.लहानपणापासूनच तिला अभ्यासाची गोडी व चिकाटी असल्याने वर्गात पहिला नंबर कधी सोडला नाही. उत्कृष्ट शिक्षणासाठी आई-वडिलांनी तिला शहरातील कन्या शाळेत पाचवीपासून दाखल केले. मात्र पिंप्राळा येथील घर ते गणेश कॉलनीतील शाळा हे अंतर शाळेत जाण्याकरिता ऑटो रिक्षाचा खर्च परवडण्यासारखे नसल्याने तिने पाचवी ते दहावी संपूर्ण शिक्षण जिद्द व आत्मविश्वासाच्या जोरदार सायकलीच्या माध्यमाने पूर्ण केले. या दरम्यान परिस्थितीमुळे अनेक खडतर अशा संकटांचा सामना तिला करावा लागला पण उत्कृष्ट शिक्षणाची कास धरल्याने तिने न डगमगता प्रत्येक संकटावर मात करून आपले शैक्षणिक कार्य अव्ययाहतरित्या सुरू ठेवले व सदर सुयश संपादन केले.आपल्या बौद्धिक क्षमतेच्या जोरावर भविष्यात तिला उत्कृष्ट अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्याचा मानस आहे.साक्षीची आई सौ.निता चव्हाण ह्या शहरातील दादवाडी पिंप्राळा येथील आयडियल इंग्लिश मीडियम स्कूल येथे खासगी शाळेत शिक्षिका असून वडिल श्री.संदीप चव्हाण जळगाव एम.आय.डी.सी.मधील लिगरॅंड कंपनीत कामगार आहेत.तिने मिळविलेल्या उत्तुंग सुयशाबद्दल समाजातील सर्व स्तराकडून तिचे कौतुक केले जात असून अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹
अभिनंदन