ठाणे येथील कु. श्रुती ही बर्नबर्ग (बर्लिन), जर्मनी येथे इंटरनॅशनल बिझिनेस मॅनेजमेंट साठी रवाना – लोकेश रविंद्र कोतवाल, पुणे

🇩🇪 *Mission Deutschland* 🇩🇪    

  *******************************
!! अभिनंदन अभिनंदन  अभिनंदन !!
*कु. श्रुती दिनेश बडगुजर*  (ठाणे)

ह.मु. मुक्ताईनगर येथील स्व. भगवान (गुरुजी) सखाराम बडगुजर व गं.भा. सुशीला आजी यांची नात, श्री. प्रकाश (भैय्या शेठ) दिगंबर बडगुजर व सौ. विजया आजी ह. मु . शिरसाड साकळी यांची नात तथा श्री. दिनेश भगवान बडगुजर (रिलायन्स जिओ मॅनेजमेंट)  व सौ. रुची ह.मु. ठाणे यांची सुकन्या कु. श्रुती ही बर्नबर्ग (बर्लिन), जर्मनी येथे इंटरनॅशनल बिझिनेस मॅनेजमेंट साठी रवाना.

कु. श्रुती हिने जर्मनी गव्हर्नमेंट ची अतिशय अवघड स्पर्धात्मक परीक्षेत उत्तुंग यश (९५/१००) मिळवून तसेच १००% स्कॉलरशिप आणि लाखोंचे पॅकेज मिळवून उच्च शिक्षणासाठी नुकतीच रवाना झाली.

जगभरातून लाखो विद्यार्थी ही परीक्षा देतात. त्यात इंटरनॅशल बिझिनेस मॅनेजमेंट साठी निवड झालेली भारतातून एकमेव महिला विद्यार्थी ठरली आहे. तसेच, आई आणि वडील यांच्या घराण्यातून परदेशी जाणारी पहिली मुलगी ठरली आहे. कु. श्रुती ही अतिशय हुशार विद्यार्थ्यांनी असून शालेय शिक्षणात सुध्दा तिने नेत्रदीपक यश प्राप्त केले आहे. तिच्या या यशात तिची आई व वडिलांनी मोलाचे मार्गदर्शन व प्रेरणा दिली त्यामुळे कु. श्रुती हे यश संपादन करू शकली असे कु. श्रुती म्हणाली.

कु. श्रुती, उत्तुंग यशा बद्दल बडगुजर.इन कडून खुप खुप अभिनंदन आणि पुढील प्रगती साठी अनंत शुभेच्छा.

कुलस्वामिनी चामुंडा माता आणि आदिशक्ती मुक्ताई माता यांचा सदैव असाच आशीर्वाद राहो हीच प्रार्थना.

4 Comments

    • दिनेश भगवान शेठ बडगुजर यांची कन्या कुमारी श्रुतीचे भारतातून एकमेव विद्यार्थिनी म्हणून बिजनेस मॅनेजमेंट साठी निवड झाल्याबद्दल तिचे व परिवाराचे खूप खूप अभिनंदन
      शुभेच्छुक सुनील मधुकर करोडपती

Leave a Reply

Your email address will not be published.


*