बोराडी येथील लोकनेते स्व . आण्णासो नथ्यू नामदेव बडगुजर व सतीदेवी पतपेढी बोराडीचे संस्थापक अध्यक्ष यांच्या लहान स्नुषा व सतीदेवी पतपेढीचे नवनिर्वाचीत उपाध्यक्ष श्री संजय नथ्यू बडगुजर यांच्या धर्मपत्नी सौ. कविता संजय बडगुजर, नथ्यू आण्णा बडगुजर सामाजिक प्रतिष्ठाणच्या संचालिका व जि.प. प्राथमिक शाळा बोराडी येथील शिक्षिका सौ . कविता संजय बडगुजर यांना Nation Builder Award 2023-24 मिळाल्या बदल हार्दिक अभिनंदन !
सौ. कविता संजय बडगुजर यांना दि. 10/3/2024 रोजी नेशन बिल्डर अवार्ड त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील विविध उपक्रम व उत्कृष्ट अध्यापन व उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल प्रदान करण्यात आला.
कनोसा कॉन्व्हेन्ट हायस्कूल धुळे येथे इनरव्हील क्लब ऑफ धुळे क्रास रोड यांच्या मार्फत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकास करणाऱ्या महिला शिक्षिकांना प्रेरणा देण्यासाठी नॅशन बिल्डर अवार्ड जिल्हा परिषद अध्यक्ष ताईसो. धरती देवरे यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय शुभम गुप्ता , माध्यमिक शिक्षणाधिकारी मा . मनीष पवार, शिक्षण विस्ताराधिकारी देवयानी वाघ मॅडम व श्री. ज्ञानेश्वर विष्णू बडगुजर . सौ . छायाबाई झानेश्वर बडगुजर, श्री. संजय नथ्थू बडगुजर व अन्य मान्यवर उपस्थित होते.

त्यांचे शिरपूर तालुका बडगुजर समाज मंडळ अध्यक्ष व अखिल भारतीय बडगुजर समाज कल्याण समिती व ओबीसी समिती प्रमुख श्री धर्मेंद्र पोपटराव बडगुजर, ओबीसी समिती उपाध्यक्ष श्री रविंद्र पंडीतराव बडगुजर, समाज कल्याण समिती माजी अध्यक्ष श्री. मोहन हिरालाल बडगुजर , शिरपूर तालुका बडगुजर समाज उपाध्यक्ष श्री. टी.टी. बडगुजर, सचिव श्री . मधुकर मोतीलाल बडगुजर व सर्व समाज बांधव व आप्तेष्टांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यांत आला.

अभिनंदन मॅडम 💐
कविताताई आपले हार्दिक अभिनंदन
Hearty congratulations to Mrs Kavita Tai Best wishes for your future carrier life