नवी मुंबई बडगुजर समाज मंडळातर्फे जागतिक महिला दिन आणि स्नेह-मेळावा

बडगुजर समाज नवी मुंबई, पनवेल व कोकण परिसर यांच्या  तर्फे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून, स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला आहे. 
हा मेळावा रविवार, दिनांक. 10 मार्च रोजी सायंकाळी ४ ते ९ वाजेपर्यंत पनवेल जवळील श्री. गणेश भोपी यांच्या निर्मिती फार्म हाऊस येथे भरविण्यात येणार आहे .कार्यक्रमाची रूपरेषा : १. चित्रकला स्पर्धा  –  ४ वाजता
२.पाककृती स्पर्धा – ४ वाजता
३. वेशभूषा स्पर्धा ( मुलींची) – ४.३० वाजता
४. पोपटीचा आस्वाद ४.३० पासून
५. परफेक्ट मैचिंग स्पर्धा  – ५ वाजता
६. महिलांचा ग्रुप डांस – ५.३० वाजता
७. ⁠विविध गेम्स  – ६ वाजता

या कार्यक्रमांमध्ये सर्वांसाठी गेम्स, तसेच व्हेज- नॉनव्हेज जेवणाची मेजवानी असणार आहे. यामध्ये सर्वांच्या सहभागात खेळीमेळीच्या वातावरणात खास भांबुर्डीच्या पाल्यासोबत मडक्यातील पोपटी देखील सर्वांदेखत बनवली जाणार आहे. 

ह्या स्नेह  मेळाव्याला ऐरोली ते पनवेल व पुढे कोंकण परिसरातील साधारण १५० बडगुजर समाज बंधू भगिनी हजेरी लावणार आहेत.

 
या कार्यक्रमासाठी नवी मुंबई,  कोंकण परिसरातील समाज बंधू भगिनींनी आवर्जून उपस्थिती लावावी असे आवाहन नवी मुंबई, पनवेल व कोकण परिसर बडगुजर समाज मंडळातर्फे करण्यात येत आहे…


Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*