खारघर, नवी मुंबई येथे राहणारे व मुळगाव गंधाली पिळोदा, ता. अमळनेर येथील श्री. प्रकाश पंडितशेठ मांडेवाल (बडगुजर) यांची काही दिवसांपूर्वी ONGC, नवी दिल्ली या कंपनी मध्ये ४० वर्षे प्रदिर्ग सेवेनंतर सेवानिवृत्ती झाली. त्यांचा सन्मान समारोह ONGC कॉर्पोरेट ऑफिस, नवी दिल्ली येथे पार पडला होता. त्यासोबतच ‘बडगुजर समाज नवी मुंबई, पनवेल व कोंकण परिवारातर्फे’ त्यांचा शुभेच्छा व सत्कार व खारघर येथील त्यांच्या घरी करण्यात आला.
श्री प्रकाश शेठ यांचा जन्म दि . १/१/१०६४ रोजी पाटण गांव, जि. मेहसाणा (उत्तर गुजरात) येथे झाला. त्यांनी मेहसाणा येथे प्राथमिक शिक्षण पूर्ण करून, पुढे १९८१-१९८४ दरम्यान भावनगर येथील ‘सर भावसिंग जी पॉलीटेकनिक कॉलेज’, सौराष्ट्र, गुजरात मधून सिव्हिल इंजिनीरिंग डिप्लोमा चे शिक्षण पूर्ण केले.
त्यानंतर ONGC, पनवेल येथे ४ वर्ष नोकरी केली. त्यादरम्यान (१९८४-१९८९) त्यांनी इन्स्टिटयूट ऑफ इंजिनीरिंग अँड ओशियन टेकनॉलॉजि ची बिल्डिंग बांधली.
पुढे ONGC, मेहसाणा मध्ये १९८९ ते २००४ पर्यंत सिव्हिल इंजिनियर पदावर १५ वर्ष नोकरी केली.
त्यांनतर त्यांनी २००४-२००७ मध्ये आसाम ऍसेट येथील ONGC या मध्ये त्यांनी ३ वर्षे नोकरी केली.
यापुढे २००७ तो २०१९ दरम्यान ONGC, मुंबई ऑफिस मध्ये १२ वर्ष कार्य केले.
श्री प्रकाश यांनी पुढे दिल्ली कॉर्पोरेट ऑफिस मध्ये २०१९ ते २०२३ अशी ४ वर्षे नोकरी केली . या दरम्यान त्यांनी “डेप्युटी जनरल मॅनेजर” या पदापर्यंत मजल मारली व ते या पदावरून निवृत्त झाले.
वेगवेगळ्या पदव्या तसेच अनुभव घेत एक्सक्युटीव्ह इंजिनियर (क्लास E0) ते डेप्युटी जेनेरल मॅनेजर (क्लास E ६ ऑफिसर) या पदावर कार्य केले. ऑइल सेक्टर मध्ये रिग फाउंडेशन, रोड अँड बिल्डिंग आणि त्यालगतचे रोड बनवले, तसेच वसाहत व ऑफिस ईमारत अशे विविध कार्ये त्यांनी केली. अश्याप्रकारे त्यांनी ONGCमध्ये विविध पदांवर त्यांनी सलग ३४+६ वर्षे नोकरी केली …
अश्याप्रकारे त्यांनी ONGCमध्ये विविध पदांवर त्यांनी सलग ४० वर्षे नोकरी केली …
त्यांचे सन १९९५ मध्ये बोदवड येथील संगीता (सौ. संगीता प्रकाश मांडेवाल) यांच्याशी लग्न झाले. त्यांना दोन मुली असून त्यांची मोठी मुलगी कु. सोनाली मांडेवाल (बी . टेक – केमिकल इंजिनियर, ९.२ CGPA , MIT पुणे) हि सध्या DRDO, पुणे येथे रिसर्च क्षेत्रात कार्यरत आहे. तिच्या शिक्षणादरम्यान तिने ५ शोध निबंध प्रकाशित केले आहेत.
त्यांची लहान मुलगी कु. देवांश्री चा जन्म २००३ साली झाला. सध्या ती दि.वाय. पाटील, पुणे येथे ‘डॉक्टर ऑफ फार्मसी’ करते आहे.
श्री. प्रकाश यांच्या पाठीशी मातोश्री गं. भा. निर्मला पंडित मांडेवाल व वडील कै. पंडित केशव मांडेवाल (कार्य वेस्टर्न रेल्वे, मुळगाव मेहसाणा) तसेच सासरे कै. रघुनाथ मारुती बडगुजर व कै शकुंतला मारुती बडगुजर (मुळगाव बोदवड ) यांचे आशीर्वाद आहेत.
श्री. प्रकाश स्वभावाने शांत व मनमिळावू आहेत, त्यांना विविध कला क्षेत्रात आवड असून, पोहोणे या खेळात विशेष आवड आहे. विविध सामाजिक कार्यक्रमामध्ये सहभाग घेणे त्यांना आवडते. निवृत्ती नंतर खारघर नवी मुंबई येथे त्यांचे वास्तव्य असणार आहे. शुभेच्छांसाठी आपण 9969225944 या क्रमांकावर संपर्क करू शकता .
गरीब कुटुंबातून पुढे आलेले व स्वकर्तृत्वावर आजपर्यंत मजल मारलेले श्री. प्रकाश यांना पुढील आयुष्य सुख समाधानाचे जावो व त्यांचे हातून समाजकार्य घडो अशी अपेक्षा ठेवून त्यांना सेवानिवृत्ती निमित्त यांचे बडगुजर समाज नवी मुंबई, पनवेल आणि कोंकण परिसर, बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ, अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप
यांच्या कडून भावी वाटचालीस शुभेच्छा!
निवृती नंतर चे आयुष्य सुखी व आरोग्य दाई जाओ ही प्रभु चरणी प्रार्थना व आपले राहिलेले कार्य पूर्ण होवो