श्रीमती मनिषा प्रविण रघुवंशी यांचा ट्राफी व प्रमाण पत्र देऊन अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे मराठी वाड़मय मडळ द्वारे आयोजित ९७ वे अखिल भारतीय मराठी सम्मेलनात सत्कार करण्यात आला – श्री. किशोर बडगुजर, सुरत

स्व प्रविण गोपीचंद बडगुजर सर अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती सदस्य यांच्या धर्मपत्नी व श्री .धर्मेंद्र पोपटराव बडगुजर , अ भा बडगुजर समाज कल्याण व ओबीसी समिती प्रमुख यांची जेष्ठ कन्या श्रीमती मनिषा प्रविण रघुवंशी यांचा ट्राफी व प्रमाण पत्र देऊन अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे मराठी वाड़मय मडळ द्वारे आयोजित ९७ वे अखिल भारतीय मराठी सम्मेलनात दि ३ ‘ फेबुवारी २०२४ रोजी सत्कार करण्यात आला .
दि. ३ फेब्रुवारी २०२४ रोजी . सकाळी १० वाजता ” लेकरेसनी माय बाप व्हवू कशी ” ही कविता म्हणून दाखवली या कवितेची निवड ईमेल द्वारे पाठवल्या नंतर करण्यात आली. सदरहू कार्यक्रम प्रताप कॉलेज अमळनेर येथे घेण्यात आला. कवितेचं सादरीकरण उत्कृष्ट केत्यामुळे त्यांचे टाळ्या वाजवून स्वागत करण्यात आले. याप्रसंगी कवीकट्टा प्रमुख श्री राजन लाखे, मा .उषा तांबे अध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळ, मा.रमेश वंसकर उपाध्यक्ष अखिल भारतीय साहित्य महामंडळ, मा. उज्वला मेहंदळे कार्यवाह साहित्य महामंडळ समन्वयक मा.प्रा.डॉ. नरेंद्र पाठक व इतर पदाधिकारी व कवि वर्ग उपस्थित होते .
श्रीमती मनिषा प्रविण रघुवंशी यांचा नाशिककरांचा खान्देश महोत्सव, शुभंकरोती साहित्य परिवार धुळे, ज्ञानाई धनाजी सांस्कृतिक मंडळ धुळे यांनी सुधा प्रमाणपत्र व ट्राफी देऊन सम्मानित केले आहे. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी इक्झाम वारीयर्स, नरेंद्र मोदी, हिंदवी स्वराज्य स्थापना -मोहन शेटे, मी मला शोधतांना – नंदकिशोर ठोबरे .
मुग्धायणी – निशा डांगे, कट्टरपंथीयांचे मार्मिक दर्शन यासारखी अनेक पुस्तके भेट म्हणून दिली व कविता संग्रह प्रकाशित करण्यासाठी प्रोसाहीत केले . लवकरच कविता संग्रह पुस्तिका प्रकाशित करणार आहे. याप्रसंगी त्यांचे सासरे ह.भ.प .किर्तनकार श्री गोपीचंद हरचंद बडगुजर ‘ सर्व आप्त मंडळी , अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣, नातेवाईक व कवि मंडळींनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत . अशीच त्यांची उत्तरोत्तर प्रगती होत राहो अशी परमेश्वर चरणी प्रार्थना.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*