University of Liverpool, England (UK) येथे चि. रोहित राजू बडगुजर याचे यशस्वीरित्या MS शिक्षण पूर्ण – श्री. योगेश बडगुजर सर, पिंप्री


चोपडा / धुळे :- चोपडा येथील समाज बांधव कै.जगन्नाथ सुपडू बडगुजर यांचा नातू व श्री. राजू जगन्नाथ बडगुजर (सेवानिवृत्त मुख्याध्यापक) आणि सौ.मंगला राजू बडगुजर (सेवानिवृत्त मुख्याध्यापिका) ओ.क. गिंदोडिया विद्यामंदिर, धुळे यांचा मुलगा चि. रोहित राजू बडगुजर M.S. या उच्च शिक्षणासाठी Master In Project Management University of Liverpool, England (UK) या ठिकाणी दि.20/09/2022 रोजी गेलेला होता. त्याने आपले शिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. तो मेरिट मध्ये पास झाला असून नुकताच 12 डिसेंबर 2023 रोजी पदवीदानाच्या कार्यक्रमात लिव्हरपूल युनिव्हर्सिटी, इंग्लंड येथील कुलगुरू यांच्या हातून MS ही पदवी प्रदान करण्यात आली.
चि.रोहित याच्या उत्तुंग यशामुळे श्री.राजू जगन्नाथ बडगुजर यांच्या परिवारात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, श्री.राजू बडगुजर यांचा परिवार हा उच्च शिक्षित असून त्याचा लहान मुलगा चि.वैभव हा M.D.(Medicine) चे शिक्षण घेत आहे. त्याचे काका श्री. सुनील जगन्नाथ बडगुजर हे विचखेडे ता.पारोळा येथे जि.प.प्राथ.शिक्षक म्हणून कार्यरत असून काकू प.स.धरणगाव येथे शिक्षण विभागात विषयतज्ञ म्हणून कार्यरत आहे आणि लहान काका श्री. विजय जगन्नाथ बडगुजर हे पारोळा येथील डॉ.व्ही.एम.जैन हायस्कूल येथे मुख्याध्यापक पदावर कार्यरत असून काकू तरडी, ता.पारोळा येथे जि.प.प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. अशा ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या परिवारात चि. रोहित ने या सर्व कुटुंबाच्या मार्गदर्शनाने आज उत्तुंग भरारी मारली आहे. यासाठी चि.रोहित यास त्याचे मामा श्री.दत्तात्रय गजानन बडगुजर व श्री. प्रमोद गजानन बडगुजर कल्याण यांचे विशेष मार्गदर्शन लाभले तसेच त्याचे मावसभाऊ श्री.निखिल निर्मलकुमार सूर्यवंशी (संपादक- सकाळ वृत्तपत्र ,धुळे) व श्री.मनोज सुधाकर बडगुजर (शिक्षक) यांचे विशेष सहकार्य लाभले.
चि. रोहितच्या या यशाबद्दल त्याची आजी गं.भा.मंडाबाई जगन्नाथ बडगुजर, श्री मगन सुपडू बडगुजर, श्री.सुभाष सुपडू बडगुजर, श्री भगवान शिवराम बडगुजर भातखेडा , श्री सोमनाथ निंबा बडगुजर सुरत यांचे शुभ आशीर्वाद लाभले तसेच संपूर्ण परिवार आत्या मामा, मावशी मावसा, आप्तेष्ट व मित्रपरिवार तसेच श्रीचामुंडा माता धर्मदाय ट्रस्ट,धुळे,, समाज मित्र मंडळ चोपडा, गुरुदत्त ग्रुप धुळे, आदिनाथ पार्क, धुळे येथील सर्व सदस्य व अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹

श्री.राजू जगन्नाथ बडगुजर (वडील),
मोबा.नंबर 9834861708
सौ.मंगला राजू बडगुजर(आई)
मोबा .नं.8830413456

4 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.


*