कल्याण :- समाज मेळावा, समाज गुण-गौरव पुरस्कार सोहळा, बडगुजर दर्शन दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन सोहळा समारंभ कल्याण (प) येथे भव्य-दिव्य स्वरूपात व उत्साहात मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा झाला. समाजातील विविध क्षेत्रातील सामाजिक काम करणाऱ्या व्यक्तींना, संस्थेला गुण-गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, त्यामुळे अनेकांना ह्या कार्यक्रमातून एक नवीन प्रेरणा मिळाली, समाजातील समाज कार्य करणाऱ्या व्यक्तींमध्ये आत्मविश्वास ह्या कार्यक्रमातून नक्कीच वाढेल यात शंका नाही.
समाजातील युवक – युवतींना सोबत घेऊन अखिल भारतीय स्तरावर उल्लेखनीय कार्य केलेल्या अखिल भारतीय बडगुजर समाज नवोदय युवा युवती मंच या संस्थेने –
२०१५ /१६ पासून गावो गांवी कुलस्वामिनी चामुंडा माता पालखी निघावी, श्रीरामनवमी, विद्यार्थी गुणगौरव सोहळा, स्त्री जन्माचे स्वागत, जेष्ठ नागरिकांना काठी वाटप, समाज भूषण पुरस्कार, महिला भूषण पुरस्कार, क्रा.सावित्रीबाई फुले पुरस्कार, मणोत्तर सन्मान सोहळा, ऑनलाईन स्पर्धा आयोजित करून नव्याने – नव उदय अशी ओळख निर्माण केली आहे., या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचा हा सन्मान…
ह्या कार्यक्रमात व्यासपीठावर प्रमुख पाहुणे मा. किशोर अप्पा पाटील (आमदार पाचोरा- भडगाव) कल्याण डोंबिवली मा.महापौर वैजयंती घोलप मॅडम, कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेंद्र भालचंद्र बडगुजर (मा.सचिव. अ.भा.ब.स.महासमिती), पुणे बडगुजर समाज मंडळ अध्यक्ष अनिल गणपत बडगुजर, उत्कर्ष मंडळ मुंबई अध्यक्ष बापू किसन बडगुजर, श्रीमती सुरेखाताई बडगुजर (पं.स.सदस्य) व लोहारी ट्रस्टचे नरेंद्र बडगुजर उपस्थित होते.
तसेच उत्कर्ष मंडळाचे मा. अध्यक्ष, सतीश दिगंबरशेठ बडगुजर, भगवान लक्ष्मण बडगुजर, श्रीकृष्ण भिका बडगुजर, मनोज उत्तम बडगुजर, जेष्ठ नागरिक पंडित नंदवाळकर, मोहन बडगुजर या सह धुळे येथून प्रा.ईश्वर बडगुजर सर, मनोहर बडगुजर, अशोक बडगुजर उपस्थित होते.
नवोदय युवा युवती मंचच्या वतीने संस्थेचे अमित बडगुजर, भाग्यश्री बडगुजर, किरण बडगुजर, सुषमा बडगुजर, मुकेश बडगुजर, शिल्पा पढियार यांनी सन्मान पुरस्कार स्वीकारला.


Leave a Reply