केंद्रीय इतर मागासवर्गीय आयोगा समोर (ओबीसी) अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती पदाधिकारी सुनावणी यशस्वी – श्री. रविंद्र पंडित बडगुजर, ओबीसी समिती उपप्रमुख

अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती तर्फे बडगुजर समाजाला केंद्रात ओबीसी मिळणेबाबत प्रयत्न सुरू आहेत. त्याकरिता महासमिती अंतर्गत ओबीसी समिती गठीत करून या समिती व्दारे याचे कामकाज बघितले जाते. याविषयीचे योग्य धोरण व नियोजन महासमिती तर्फे वेळोवेळी करण्यात आली. याच समिती मार्फत अ. भा. ब. स.महासमिती चे प्रतिनिधी मंडळ दिल्ली ला सुध्दा जाऊन आले आहे.

या संबंधी दिनांक 22.7.2023 रोजी प्रशासकीय सेवेतील, मंत्रालयातील कामकाजाचा अनुभव असलेल्या समाजाच्या अधिकारी यांच्या मदतीने मंत्रालयात प्रशासकीय मार्गाने अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती पदाधिकारी व ओबीसी समिती मार्फत प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. तसेच महामंडळाचे सचिव यांनी पुन्हा तत्काळ सेवे मार्फत हाच प्रस्ताव मंत्रालयात अचूक टेबलावर पोहोचेल असे पाठविण्यात आले.

दिनांक 17.10.2023 रोजी मुंबई येथे मंत्रालयात केंद्रीय आयोगासमोर सुनावणी करिता महासमितीचे सदस्य व ओबीसी समितीचे अध्यक्ष व इतरही पदाधिकारी हजर राहिले. त्यात महासमिती ने पाठविलेल्या प्रस्तावचाही उल्लेख अधिकार्‍यांनी केला.

एकंदरीत केंद्रीय आयोग आपला सकारात्मक विचार करून आपणांस न्याय देईल, असे निश्चित खात्री वाटते. असे यावेळी अ. भा. बडगुजर समाज महासमिती च्या प्रतिनिधी मंडळाचे प्रमुख व मान्यवर यांनी व्यक्त केले. तसेच आपण सादर केलेली माहिती योग्य असून यावरून आपला केंद्रात ओबीसी चा मार्ग मोकळा होईल अशी दाट शक्यता आहे. याकरिता महासमिती पदाधिकारी व ओबीसी समिती प्रयत्नशील आहे.

समाजाने याविषयी एकजुटीने कार्य करणे गरजेचे आहे. असे आवाहन महासमितीचे श्री. सुरेश महाले यांनी व्यक्त केले.

तरी याविषयी कोणाला रूची असल्यास अ. भा. ब. स. महासमिती किंवा ओबीसी समिती समिती प्रमुख श्री. धर्मेंद्र बडगुजर, उपसमिती प्रमुख श्री. रविंद्र बडगुजर यांचेशी संपर्क साधावा.

2 Comments

  1. अखिल भा.ब.स.महासमितीचे प्रयत्नांना यश येईलच माता चामुंडाच्या आशिर्वादाने

Leave a Reply to Bhagwan Girnar Cancel reply

Your email address will not be published.


*