सोनशेलु येथील कुलस्वामिनी आई चामुंडा देवीच्या मंदिराला रंगकाम संपन्न – श्री. दिलीप बडगुजर


शिंदखेडा तालुक्यातील सोनशेलू येथील आपल्या समाजातील पहिले मंदिर कुलस्वामिनी आई चामुंडा मातेचे भव्यदिव्य असे मोठे मंदिर आहे. त्या संपूर्ण मंदिराचे रंगकाम बाकी होते. ह्या संपूर्ण मंदिराचे अत्यंत चांगल्या पद्धतीचे रंगकाम शिंदखेडा येथील आपल्या बडगुजर समाजातील दानशूर व्यक्तिमत्व, प्रसिद्ध व्यापारी, न्यू रवींद्र ट्रेडिंग कंपनीचे मालक व चामुंडा माता ट्रस्ट सोनशेलुचे ज्येष्ठ सदस्य श्री संतोष रावजी शेठ बडगुजर व यांच्या परिवाराच्यावतीने संपूर्ण मंदिराला व मातेच्या मूर्तीला रंगकाम करण्यात आले. या कामामुळे संपूर्ण मंदिराचे स्वरूप हे अत्यंत आकर्षक व सुंदर अशा पद्धतीचे झाले आहे. म्हणून या दात्यांचे आई चामुंडा देवी ट्रस्ट सोनशेलु, समस्त बडगुजर समाज व सरपंच सोनशेलु यांच्याकडून अभिनंदन चा वर्षाव व आभार व्यक्त करण्यात आले आहे.

1 Comment

  1. रविंद्र भाऊ ! आपण दाखवलेल्या दातृत्वा बद्दल कौतुकास पात्र आहे. ! आपले हार्दिक अभिनंदन !

Leave a Reply

Your email address will not be published.


*