बडगुजर बिझनेस नेटवर्क ची यशस्वी सुरुवात – पुणे येथे जमला उद्योजकांचा मेळा

बडगुजर बिझनेस नेटवर्क ची यशस्वी सुरुवात – पुणे येथे जमला उद्योजकांचा मेळा

बडगुजर उद्योजक समाज बांधवांचा एक आगळावेगळा अनोखा उपक्रम

पुणे : बडगुजर बिझनेस नेटवर्क टिम तर्फे आयोजित बडगुजर उद्योजक परिचय मेळावा पिंपळे सौदागर येथे दि. १५ ऑक्टोबर २३ रोजी रविवारी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला होता. यावेळी बडगुजर समाजातील २०-२५ उद्योजकांनी हजेरी लावली. व्यासपीठ विरहीत कार्यक्रमाचे विशेष ठरले. तसेच प्रत्येक उद्योजकांनी आपला परिचय देत एक प्रतिज्ञा घेत आपल्या व्यवसाय विषयक माहिती प्रेझेंटेशन करत सांगितली.

या उपक्रमातून समाजामध्ये B2B आणि B2C तसेच रोजगार उपलब्ध करणे, स्टार्ट अप्स् ला प्रोत्साहन देणे, व्यवसाय मार्गदर्शन करणे व व्यवसाय संबंधित कार्यक्रम आयोजित करणे असे विविध उपक्रम आयोजन करण्यासाठी या प्लॅटफॉर्मची निर्मिती केली असे प्रास्ताविक मध्ये श्री. राजेंद्र बडगुजर यांनी मांडले.

बडगुजर समाजातील उद्योजकांना एका व्यासपीठावर आणणे, आपसात बिजनेस करण्यामध्ये प्रोत्साहन देणे तसेच एकमेकांना व्यवसाय वाढीस मदत करणे, उपस्थित सर्वांनी इतर उद्योजकांचे माहिती प्रचार प्रसार करणे व आपल्या परिचयातील एखाद्या व्यक्तीस त्यांच्या प्रॉडक्ट किंवा सर्विसेस लागत असल्यास त्यांना आपल्या समाज बांधव उद्योजकाशी कनेक्ट करून देणे. तसेच कुठल्याही व्यवहार करताना त्यामध्ये पारदर्शकता व योग्य ती काळजी घेऊनच व्यवहार करावे असे यावेळी लोकेश कोतवाल यांनी बोलतांना सांगितले.

बडगुजर बिजनेस नेटवर्क चे पुढील ध्येयधोरण व महिन्यातून एकदा या प्लॅटफॉर्मची एक मीटिंग आयोजित करावी, याचा निर्णय घेण्यात आला तसेच या व्यासपीठांतर्गत बडगुजर समाजातील विविध ठिकाणी उपक्रम घेऊन समाजातील सर्व समाज बांधवांना संघटित करण्याचे प्रयत्न करण्यात येतील. याविषयी एकमताने निर्णय घेण्यात आले. या संदर्भात पुढील मीटिंग ३ डिसेंबर २३ रोजी रविवार रोजी आयोजित करण्यात येणार आहे. तसेच आलेल्या सर्व उद्योजक समाज बांधवांनी दिलेले प्रेझेंटेशन व त्यांची माहिती बडगुजर डॉट इन च्यामार्फत सर्व समाज बांधवांपर्यंत पोहोचवण्यात येईल.

यावेळी पुणे येथील उद्योजक श्री. प्रशांत बडगुजर, श्री. राहुल बडगुजर श्री. विजय बडगुजर श्री. मनीष बडगुजर, श्री. भगवान बडगुजर, श्री. संदीप बडगुजर, श्री. अविनाश बडगुजर, महिला उद्योजिका सौ. सारिका महेंद्र पवार, सौ. भारती बडगुजर, सौ. नीलिमा बडगुजर, श्री शैलेश बडगुजर, श्री सुहास बडगुजर, श्री. हर्षल बडगुजर, श्री. राजेंद्र बडगुजर, श्री. ललित बडगुजर, श्री. धिरज बडगुजर, श्री. सुषानंद बडगुजर, डॉ. विशाल बडगुजर आदि उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. राजेंद्र बडगुजर, श्री. मनीष बडगुजर, श्री. विजय बडगुजर, श्री. लोकेश कोतवाल यांनी परिश्रम घेतले.

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.


*