शिरपूर येथील चि. दिपेश विलासराव बडगुजर उच्च शिक्षणासाठी आयर्लंडला रवाना -श्री. लोकेश रविंद्र कोतवाल, पुणे

शिरपूर येथील सौ. अनिता व श्री. विलासराव दंगल बडगुजर (सेवानिवृत्त मुख्याध्यापक के. व्ही. पी. संस्था शिरपूर) यांचा कनिष्ठ चिरंजीव दिपेश विलासराव बडगुजर दि.१५/९/२०२३ रोजी आयर्लंड मध्ये डब्लिन येथील नामांकित युनिव्हर्सिटी मध्ये क्लाउड कॉम्प्युटिंग या विषयात मास्टर डिग्री चे उच्च शिक्षण घेण्यासाठी रवाना झाला. मोठा भाऊ श्री. सागर विलासराव बडगुजर ( M.Tech.) बंगलोर आणि वहिनी सौ.ऋतुजा सागर बडगुजर (BE,C-Dac) बेंगलोर दुसरा भाऊ श्री. राकेश विलासराव बडगुजर ,अमेरिका (Master of Computer Science,Texas) आणि वहिनी सौ.योगेश्वरी राकेश बडगुजर,अमेरिका(Master of Data Science,Texas)
यांच्याप्रमाणे दिपेशने मोठे दोघ भाऊ आणि दोघ वहिनी यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पुढील शैक्षणिक वाटचाल करण्याचा मानस निश्चित केला. या सर्वांचा आदर्श व मार्गदर्शन डोळ्यासमोर ठेवून दिपेशने मनाशी निश्चय केला की उच्च शिक्षित व्हावे म्हणून त्याने जिद्द, चिकाटी व मेहनतीने “अशक्य ते शक्य” करून दाखवून आपले स्वप्न साकार केल्याच्या मनस्वी आनंद झाला आहे.त्यानुसार BE (I.T) पुणे ची डिग्री करून नुकतेच C-DAC बेंगलोर येथे प्रथम श्रेणी प्राप्त करून Master in Cloud Computing या विषयात उच्च पदवीसाठी आयर्लंड (डब्लिन) येथे गेला आहे. जिद्द चिकाटी आणि स्वंयप्रेरणेमुळे दिपेश हे यश प्राप्त केले. तिघेही बंधू हे अतिशय अभ्यासू व जिज्ञासू आहेत व त्यांना आई वडिलांची साथ व योग्य मार्गदर्शन मिळाल्याने आज तिनही मुले दोन सुना उच्चशिक्षित आहेत.


या सर्व यशामागे आई- वडील, शिक्षक, घरातील सर्व ज्येष्ठ ,आप्तेष्ट व नातेवाईक या सर्वांचे आभार मानून दिपेशने कृतज्ञता व्यक्त केली. दिपेशने मिळवलेल्या यशाबद्दल त्याचे सर्व आप्तेष्ट,नातेवाईक, शिरपूर बडगुजर समाज व इतर सर्व समाजातील बंधू भगिनी, मित्रपरिवार यांच्याकडून कौतुक होत असून पुढील दैदिप्यमान वाटचालीस हार्दिक शुभेच्छांच्या वर्षाव होत आहे. चि. दिपेश यांस पुढील वाटचालीस बडगुजर. इन कडून हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन.

4 Comments

  1. HEARTY CONGRATULATIONS DIPESH. WISH YOU A VERY HAPPY JOURNEY AND PLEASANT STAY AT DUBLIN.STAY BLESSED ALWAYS.
    WISH YOU A VERY BRIGHT FUTURE.

    • धन्यवाद सध्या कुठे आहेत,आम्ही बेंगलोरला आहोत
      कळावे

Leave a Reply to Bhagwan Girnar Cancel reply

Your email address will not be published.


*