नर्मदा परिक्रमा एक विलक्षण अनुभूती भाग ८५
नर्मदे हर…
मागच्या भागात मी तुम्हाला सूर्यकुंड येथील हनुमान मंदिराच्या एका रहस्या बद्दल सांगत होते. मागच्याच भागात सूर्य कोंडा च्या आधी घेतलेल्या बाबाजींचा अनुभव मी तुम्हाला सांगितला होता. सूर्य कोंडला पोहोचताच मुसळधार पाऊस सुरू झाला होता. जणूकाही आम्ही मुक्कामी पोचण्याची वाटच मैया बघत होती आणि तिने वरून आभाळाची पोठली घट्ट बांधून ठेवली होती की काय असं वाटलं. आता पुढे सांगते.
इतना परिसर अतिशय रमणीय आहे. सूर्याचे सात पांढऱ्या रंगाचे घोडे असलेला हा रथ मंदिराच्या वर आरूढ आहे. बाजूलाच एक एक हॉल आहे तीच परिक्रमावासीयांची धर्मशाळा. आजूबाजूला पुजाऱ्यांची घरं आहेत. 1-2 छोटी मंदिरही आहे. पाऊस साधारण तास दीड तास सुरू होता. बाबा आसन लावून आराम करत पडला होता. मी मात्र बाहेरच्या पडवीत पावसाकडे बघत बसले होते.
आमच्यासोबत धर्मशाळेत आत मध्ये अजून कोणीतरी परिक्रमावासी डोक्यावरुन पांघरूण घेऊन झोपले होते. वातावरण थंड झालं होतं, आणि अशात चहा मिळावा असं शरीराचं मागणं होतं.. आतच एका कोपर्यात चूल, एक दोन भांडी आणि काही सामान ठेवलेलं मला दिसलं. जवळच पाण्याने भरलेला माठ देखील ठेवला होता. चहा करावा म्हणून मी साहित्य पाहू लागले. तोच अंगावर पांघरूण घेतलेले हे परिक्रमावासी उठले आणि मोठ्यांदा ओरडू लागले…
” अरे छूना मत, तुम हटो वहांसे…” मी दचकले, घाबरले अन तशीच मागे झाले…. प्रश्नार्थक नजरेने त्या परिक्रमावासी बाबांकडे बघू लागले… “हमको पहले अपनी चाय बनाने दो, हम तुम्हारे हाथ से बनी चाय नही पायेंगे.. कौन समाज की हो?” असं म्हणत ते बाबाजी सामानाच्या दिशेने सरसावले आणि मी दोन पावलं मागे झाले… “पंडित समाज की हुं बाबाजी, मी उत्तर देत असतानाच बाबाजी खाली वाकले आणि सहजतेने काहीतरी काडीकचरा चुलीच्या मागचा बाजुने उचलून दाराकडे फेकला. ते चहा करू लागले… “हम किसी के हात का नही पाते है तुम पाओगे तो तुम्हारे लिए भी चाय बना देता हु” असं म्हणत त्यांनी चहा ठेवला आणि दारा कडचा फेकलेला काडीकचरा बाहेर फेकून देतो असं म्हणून दाराकडे येऊ लागले. मी निदान कचरा उचलण्याचं तरी काम करावं म्हणून त्यांच्यापाठोपाठ दाराकडे गेले… मी दाराकडे गेले आणि स्तब्ध उभे राहिले.. कारणही तसंच होतं… बाबाजींनी फेकलेला काडीकचरा हा साधासुधा काडीकचरा नव्हताच मुळी! तो चक्क हातभर लांब साप होता. धर्मशाळेत इलेक्ट्रिसिटी तर आहे मात्र फक्त एक छोटा बल्ब चालू अवस्थेत असल्याने हॉल भर बर्यापैकी अंधार होता. एका छोट्या बल्बचा काय तो उणा पुरा प्रकाश… त्यात चुली मागचा तो साप मला अजिबात दिसला नसता… बाबाजींना कसाकाय दिसला तेच जाणे… असो… प्रत्येक गोष्टी मागे कारणं असतात!
बाबाजींनी चहा केला. सोबत आम्हाला वाटेत मिळालेली पारलेजी बिस्किट होती. संध्याकाळचा नाष्टा छान झाला. आता पाऊस थांबला होता.. दिवेलागणीला अजून वेळ होता. आम्ही हात पाय धुऊन मंदिरांचं दर्शन घेतलं. त्यावेळी मारुतीराया यांचं रूप एका प्रौढ व्यक्ती सारखं दिसत होतं. चेहऱ्यावरचे हावभाव शांत से दिसत होते. त्यावेळी तिथल्या पुजाऱ्यांनी सूर्यकुंड च्या हनुमान मंदिराचे रहस्य उलगडून सांगितलं. दिवसाच्या सुरुवातीच्या प्रहराला बालरूप, दुपारभर मध्यम वयीन, आणि रात्री वृद्ध रूप असल्यासारखे हे मारुतीराय दिसतात. मंदिराच्या वर असलेल्या जाळीतून पडणारा प्रकाशाचा कोण हा जसजसा बदलत जाईल तसतसं आरोपीला यांचं रूप बदलत जातं हे यामागचं कारण. आता मला रात्रीच ग्रुप तरू आणि दिवसाचं बाल रूप बघण्यात जास्त रस वाटू लागला. रात्री भोजन प्रसादी झाल्यानंतर मंदिर बंद करण्या आधी आम्ही पुन्हा एकदा मंदिरात गेलो. पुजाऱ्यांनी सांगितलेल्या पद्धतीने बघितल्यानंतर मारुतीराया खरोखरच वृद्ध झालेली आहे असा भास होऊ लागला मात्र त्याच बरोबर दुपारचे किंचित शांत असलेले भाव बदलले आहेत असा मला भास झाला. हे वृद्ध मारुतीराय मला रागात असल्यासारखे वाटू लागले. पण मारुतीराय माझ्यावर नक्कीच रागवणार नाहीत कारण त्यांच्याप्रती माझी भक्ती ही संपूर्णपणे निस्वार्थ अशी आहे हा मला विश्वास होता. मग तरीही मला मारुतीराय रागात का दिसले असा प्रश्न क्षणभर वाटून गेला… आता पडलेल्या प्रश्नांचा विचार न करण्याची सवय एव्हाना लागली होती. ज्या प्रश्नांची उत्तरं मिळायची असतात त्या प्रश्नांची उत्तरं आपोआप मिळत जातात हे चांगलंच माहीत झालं होतं. ती उत्तरं मिळेस तोवर मनाची घालमेल न होऊ देता संयमाने फक्त वाट बघणं आपल्या हाती असतं एवढं समजलं होतं… आला तसा तो प्रश्न मी तिथेच सोडून दिला.
बाबाजींनी रात्रीची भोजन प्रसादी बनवली. आज दिवसभराचा प्रसंग डायरीत घेताना खूप समाधान वाटत होतं आणि त्या समाधानी अवस्थेतच मी झोपी गेले. दुसऱ्या दिवशी नानाजी आटोपून पुन्हा मंदिराकडे धाव घेतली आणि मला माझ्या काल सोडून दिलेल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं.कारण आता मारुतीराया माझ्याकडे एका गोंडस कोवळ्या मात्र तेजस्वी आणि बलवान बालकाप्रमाणे बघत होते.कालचे वृद्ध मारुतीराय कुठेतरी हरवले होते त्यांचा राग दूर निघून गेला होता आणि आता मला त्यांच्या चेहर्यावर लाघवी स्मितहास्य दिसत होतं. मारुती रायांची तिन्ही रूप पाहून झाली होतीत. सकाळचं बाल अभंग आटपून आम्ही पुढे निघायचं ठरवलं.
इथून पुढे महाराजपुर सहस्त्रधारा घाघा असा मार्ग आहे. घाघा पर्यंतचा मार्ग शहरा गावांमधून जातो. मात्र घाघाच्या पुढील जंगल मार्ग सुरू होतो. त्यामुळे संध्याकाळ होईस्तोवर आम्हाला निदान घाघा पर्यंत पोहोचायचं होतं. आज तिथून पुढे जायचं नव्हतच आम्हाला कारण घाघा पर्यंत पोहोचता पोहोचता नक्कीच संध्याकाळ होणार होती. आणि आम्हाला आज निघायला देखील उशीरच झाला होता.
आज मैया नी आमचे लाडच करायचं ठरवलं होतं बहुतेक. काल पाऊस पडला होता तरी आज वातावरण चांगलंच गरम होतं. शिवाय हवेत पाण्याचा औषध असल्यामुळे दमटपणा देखील फार होता. खरंतर सूर्यकुंड ते महाराजपूर फार अंतर नाहीये. पण तरीही महाराज पुरला पोहोचेस्तोवर थकायला झालं होतं. इथे बंजर आणि नर्मदामैया चा संगम होतो. संगमावर छान मंदिर आहे. धनीराम बाबा यांची समाधी आहे. खरंतर इथे छान धर्मशाळा आहे असं हे ऐकून होतो, मात्र थांबून जावं असं वाटलं नाही. डांबरी रस्त्याने आम्ही पुढे निघालो. रस्त्यात एक एक मध्यमवयीन माणूस आम्हाला भेटला. पाच मिनिटं थांबा तुमच्याशी काम आहे आलोच असं म्हणून निघून गेला… म्हटल्याप्रमाणे अवघ्या पाच मिनिटात तो परत आला आणि त्याने आमच्यासाठी आइस्क्रीमचे कोन आणले होते… दमट हवा आणि उकाडा यात ते आईस्क्रीम खाताना खूप आनंद होत होता आणि शरीराचा थकवा देखील कमी होत होता… तिथून पुढे निघालो तो एका बाईने दुकानातून आवाज दिला.. तिथेही मस्त गारेगार रबडी कुल्फी माताजींनी खाऊ घातली… आज नर्मदा माई च्या मनात काय होतं कोण जाणे… आज तुम्ही आमचे खूपच लाड करायचं ठरवलं होतं… थोडं पुढे जात नाही तर एका उसाच्या रसाच्या केल्यावर आम्हाला थांबवण्यात आलं… हिरवाकंच गारेगार बर्फ घातलेला उसाचा रस म्हणजे त्या थक्क करणाऱ्या वातावरणात अमृत प्यायला सारखं वाटत होतं…. आज नक्की काय झालंय महिन्याला एवढे लाड पुरवते ती….
आम्ही पुढे निघालो. इथून घाघा साधारण 13 -14 किलोमीटर असेल. आमच्याकडे वेळही भरपूर होता. आम्ही घाघालाच मुक्काम करण्याचं ठरवलं. घाघाच्या दिशेने जाताजाता हळूहळू रस्त्यावरची गर्दी विरळ होत गेल्याचं दिसत होतं. आम्ही हळू हळू गाव सोडून जंगलाच्या दिशेने पुढे सरकत होतो. लोकवस्ती कमी झालेली होती. दोन-तीन किलोमीटर नंतर रस्त्याच्या दोन्ही बाजूला केवळ झाडीच होती. अशात पुन्हा निसर्गाने आपलं रूप बदललं. घाघा आता आठ किलोमीटरवर होतं. मात्र आभाळ भरून येऊ लागलं. महाराजपुर ते घाघा या रस्त्यावर कुठलीही व्यवस्था नाही हे आम्ही पुस्तकामध्ये वाचलं होतं. अशा वातावरणात पुढे आठ किलोमीटर म्हणजे जवळ जवळ दोन संवाद दोन तास चालत जाणं योग्य नव्हतं. सध्या आम्ही गावाच्या थोडं तरी जवळ होतो. इथून पुढे झालो म्हणजे जंगलाच्या दिशेने जाणं होतं. त्यामुळे आम्हाला आता निवारा शोधणं गरजेचं होतं. मात्र कुठेच काही सापडत नव्हतं… मग कुठे गेलो आम्ही? घाघा ला पोहोचलो का? वाटेत कुठे थांबलो का? निवारा मिळाला का? सांगणार आहे पण पुढच्या भागात, तोवर नर्मदे हर …


Leave a Reply