यावल येथील श्री. संजय लोटनशेठ आलोने मुख्याध्यापक अनुदानित आश्रम शाळा मनवेल तालुका यावल आणि सौ. मनीषा संजय आलोने उपशिक्षिका जि. प. मुलींची शाळा साकळी तालुका यावल यांची कन्या तसेच, चिंचोली तालुका यावल येथील प्रगतिशील शेतकरी श्री लोटन खंडूशेठ आलोने यांची नात कु. महिमा संजय अलोने या नुकत्याच बीडीएस परीक्षेत 69.70 % गुणांनी उत्तीर्ण झाली.
आई शारदेचा वरदहस्त लाभलेल्या कुटुंबामध्ये कु. महिमाचा जन्म झाला. तिचे प्राथमिक शिक्षण धुळे येथील आजोबा मधुकर रतन पवार यांच्याकडे झाले.
आई-वडिलांनी दिला ज्ञानरूपी वसा
आम्ही चालवू हा पुढे वारसा
पिता बंधू माता तुम्ही माऊली
तुम्ही कल्पवृक्षातळी सावली
तुम्ही सूर्य आम्हा दिला कवडसा…
आई-वडिलांमधील गुण तिच्यात हस्तांतरित झाल्यामुळे इयत्ता दहावीला सन 2016 -17 या वर्षी सरस्वती माध्यमिक विद्यालय यावल येथून ती 93 टक्क्यांनी उत्तीर्ण झाली होती. तर पुणे येथील अशोक विद्यालयातून अकरावी बारावी सायन्समध्ये 79 टक्के गुणांनी ती उत्तीर्ण झाली.
आपल्या मधील उपजत गुणांचा ठसा तिने बालपणापासूनच उमटविलेला होता. याच कौशल्यांच्या जोरावर डॉ.राजेंद्र रामदासजी कांबे दंत महाविद्यालय व हॉस्पिटल अकोला येथे तिने बीडीएस साठी प्रवेश घेतला. नुकत्याच जाहीर झालेल्या शेवटच्या वर्षाच्या निकालामध्ये 69.70% गुण मिळवत तिने बीडीएस डॉक्टर ही पदवी प्राप्त केली. तिने मिळवलेल्या या यशामुळे तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
तिला मिळालेल्या या यशानिमित्त अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती सदस्य, बडगुजर प्राऊड ग्रुप आणि बडगुजर डॉट इन यांच्यावतीने खूप खूप अभिनंदन व भावी वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा.💐💐💐💐💐👍👍
शुभम भवतु ..! यशस्वी भव…!
शब्दांकन_ प्रा. मिलिंद बडगुजर जळगाव ( 94 21 18 44 95 )



Congratulations!