रिलायन्स फाउंडेश कडुन बारावी उत्तीर्ण होऊन, पुढील पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती – श्री. मुरलीधर बडगुजर, धरणगांव

रिलायन्स फाउंडेश कडुन बारावी उत्तीर्ण होऊन, पुढील पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची घोषणा ही केली आहे. यामध्ये ५००० विद्यार्थ्यांना प्रत्येकी २ लाख रुपये पर्यंत शिष्यवृत्ती दिली जाते. यासाठी विद्यार्थ्यां यांनी स्वतः १५ ऑक्टोंबर २०२३ पर्यंत अर्ज हा करावा लागणार आहे.
रिलायन्स फाउंडेशन कडून दरवर्षी ही शिष्यवृत्ती दिली जाते. गुणवत्ता असूनही केवळ आर्थिक अडचणीमुळे गुणवत्तापूर्ण शिक्षण घेण्यास काही विद्यार्थ्यांना अडचण येऊ नये यासाठी गरजूंना ही शिष्यवृत्ती दिली जाते. यासाठी विद्यार्थ्यांना पदवी अभ्यासक्रमाच्या निवड चाचणीत मिळालेले गुण व इयत्ता बारावी मध्ये मिळालेले गुण, त्याचे कौटुंबिक उत्पन्न आणि अन्य पात्रतांचा निकर्षांचा विचार केला जातो. दरम्यान या शिष्यवृत्ती बद्दल अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी खालील दिलेल्या संकेतस्थळाला भेट द्यावी


www.scholarships.reliancefoundation.org

अधिक माहिती साठी खालील दिलेला यूट्यूब व्हिडीओ पहावा …..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*