नर्मदा परिक्रमा:एक विलक्षण अनुभूती👇भाग👇 ६०👇
*माझं हे वाक्य ऐकून अंकित नावाचा २२-२५ चा तरुण उठून भा राहिला. तो बेचैन आणि रागात दिसत होता… होताच तो रागात… तो दोन्ही हात कमरेवर ठेवून माझ्या समोर येऊन उभा राहिला आणि मला बोलू लागला. “मैयाजी आप वापस घर चाले जाईये, आप को परिक्रमा करनी ही नही चाहिये….आपको नही लगता आप गलत हो?” मला कळेच ना की असं हा का बोलतोय? मी विचारलं क्या हुआ अंकित बाबाजी,आप इतना नाराज क्यू हुये?” तर म्हणाला, “अपने आप को समझाईये, क्या कर रहे हो आप? गलतिया करते जा रहे हो….कृपा करके अपने मन को साफ रखिये….” मला तरीही समजे ना.. शेवटी तो स्पष्ट बोलला.. “आप जिस दिन परिक्रमा उठाये है, उस दिन से आपकी जिम्मेदारी मैया ने ले लीयी है, आपको आपकी चिंता करने की जरुरत नही.. अरे जब आपको पता है की इतने घने जंगल से आप सुरक्षित बाहर निकली है, वो भी दो बार तो इसका मतलब क्या है मा? लोग तो कूछ भी बोलेंगे…क्योंकी उन्हे डर है.. आप क्यू डर रहे है, आपके साथ तो स्वयं माताजी है.. आईये आपको एक और कहानी सुनाता हू”.. तो सांगू लागला*
*कूछ दिन पहले की बात है, शायद ३ महिने हो गये. आप अब कल आगे जायेगी तो एक महुआ का पेड मिलेगा. वहा औरते महुआ के फुल जमा करने जाती है. वहा एक दिन गांव की एक माताराम गयी तो उसने एक परिक्रमा वासी को वहा विश्राम करते देखा.. दोनो में काफी बातचीत हुई, वह परिक्रमा वासी वहा २ घंटे से विश्राम कर रहा था. वो बिलकुल अकेला था. अपना विश्राम होने के बाद वह चला गया और उसके कुछही देर बाद इस माताराम पर वाघ ने हमला कर दिया.. वो तो उसके पास हथियार था तो वो बच गयी लेकीन एक बात समझो, परिक्रमावासी पर हमला नही किया उसने.. अरे परीक्रमावासी को कोई परेशान कर ही नही सकता… आप बस भरोसा रखो… मा आपके साथ है, जो करेगी आपका भला ही करेगी….बस बोल दिया मैने तो”*
*खरच मला माझी लाज वाटली… मी दोन दा रमत गमत जात असताना देखील मला भीतीचा स्पर्श ही झाला नाही आणि अचानक तो फलक पाहून मला भीती वाटली. मला माहित होतं ही माझ्या मनाची भीती आहे… जे काही वाचलं ऐकलं असेल त्यांनी असेल, पण आहे मात्र…पण आता यापुढे भीती वाटू द्यायची नाही… मी ठरवलं.. माझा भरवसा नाही मैयावर असं नव्हतं खरं, पण भीती होती हे ही तितकच खरं.. त्यानंतर मला अशी भीती वाटली नाही, पण हुरहूर किंवा सावधता कायम राहिली हे ही खरं.. मागे सांगितलं तसं मला मृत्युची भीती नाही, पण माझा जीव अजूनही माझ्या लेकरात अडकला आहे…अगदी कुणाचं कुणाशिवाय अडत नाही, आणि हे फेरे कसे असतात, आपण साक्षी राहायचं असतं, हे सगळं माहित असून सुद्धा “माझ्या पिलाची आई” काही सुटत नाहीये… हो, कमी झालय नक्की, पण सुटलं नाहीये अजून…. कदाचित जवाबदा-या संपल्या की सुटेल…आणि तोवर मी असावी असं त्या ही वेळेस वाटलं…. पण अंकित च्या कान उघडणीचां एक परिणाम झाला.. जरा हूर हूर वाटली की मी मैयाशी डायरेक्ट बोलू लागले, आणि हळू हळू ही भीती कमी झाली…माझी मैया माझं जे काही करेल ते योग्य च असेल हे पक्क होवू लागलं आणि मैयाशी संवाद वाढत गेला…मग मात्र मी मैयाच्या जास्त जवळ गेले. आधी नव्हते असं नाही, पण विश्वासाची काच खरच नाजूक असते…एखादा ओरखडा सुद्धा घातक ठरतो.*
*अंकित च्या रुपात तिनी माझी कान उघडणी केली, रागावली ती मला, पण नंतर तिनी भरपूर लाड केले. त्या रात्री त्या उघड्या खोलीत झोपताना हुरहूर वाटली नाही, आणि आता उद्या निघायचं म्हणून लवकर उठलो. हा दिवस होता ३० जानेवारी चा. अंकित कडे चहा ला बोलावलं होतं, आणि मला सारखे फोन येत होते. हा माझा वाढदिवस. मागे कुक्षीला कुक्षी मा नी माझा वाढदिवस गायत्री यज्ञ करून साजरा केला होता, आणि आज मैया अजून काहीतरी करून देणार होती.*
*आज मैयांनी माझ्यासाठी खूपच खास काहीतरी ठेवलं होतं. माझी खूप खूप प्रेमाची माणसं करतील तसं सगळं आज अंकित च्या घरी करण्यात आलं होतं, ते ही अगदी कमी वेळात…*
*अंकित चं घर छान मोठं आहे, घरी आई बहिण सगळे आहेत. माझा वाढदिवस आहे हे समजल्यावर अंकित च्या आईनी माझं औक्षवण केलं. माझ्या हातापायाला तेल लावलं, गरम पाणी आंघोळी साठी दिलं आणि एक पांढरी मउ शाल पण दिली… गम्मत म्हणजे माझ्यासाठी खास खीर पुरी चं जेवण तयार करण्यात आलं, ते ही अगदी अर्ध्या तासात केलं त्यांनी. माझी आंघोळ झाली, आणि आधी मंदिरात जायचं ठरलं. इथे पण मला काहीतरी स्पेशल मिळणार होतं..*
*ह्या मंदिराची एक गम्मत आहे. इथे एक नव्हे तर दोन पिंडी आहेत, त्या ही आमोरा समोर, आणि तुम्ही भाग्यवान असाल तर तुम्ही एका वेगळ्याच अनुभवाचे धनी व्हाल, एक चमत्कार तुम्हाला नक्की बघायला मिळेल.. माझं भाग्य तर त्या मैयानी स्वत:च बसून लिहिलं होतं. कारण जन्मदिवसाच्या दिवशी अश्या अनुभवाची प्राप्ती होण हे भाग्य… पण या भागात सांगता यायचं नाही.. सांगते,पण पुढच्या भागात.*
सुरुची नाईक..
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️


Leave a Reply