१५ ऑगस्ट ७६ वा स्वातंत्र्य दिन
🇮🇳भाग ↕️२🇮🇳
🇮🇳माझा🇮🇳तिरंगा🇮🇳
↕️
माझा🇮🇳तिरंगा माझी शान
माझा👍देश जगात महान
देशाच्या अमृत महोत्सवाला
तिरंग्याचा रंग चढला
तिरंगा फडकेल घरोघरी
रांगोळी शोभणार दारोदारी
माझा🇮🇳तिरंगा माझी शान
माझा👍देश जगात महान
प्रणाम माझा या कार्यक्रमाला
सलाम करती सारे तिरंग्याला
रॅलीत घोषणा मुले देती
मनी सारे अभिमान बाळगती
माझा🇮🇳तिरंगा माझी शान
माझा👍देश जगात महान
देशभक्तीची गाणी गुणगुणती
हर्ष उल्हासाने मिळुन नाचती
एक सुरात राष्ट्रगीत गाती
स्वातंत्र्याचा जल्लोष करती
माझा🇮🇳तिरंगा माझी शान
माझा👍देश जगात महान
सण सोन्याचा करू साजरा
चेहरा ठेऊ नेहमी हसरा
एकतेची मशाल पेटली
भारतमाता तिरंग्याने नटली.
माझा🇮🇳तिरंगा माझी शान
माझा👍देश जगात महान
हृदयात पेटती एकच ज्वाला
देश भक्तीचा नशा हा चढला
भारत भर एकच नारा
अखंड भारत बांधू सारा
👍🇮🇳🚩🇮🇳🚩🇮🇳👍 ¶¶¶¶¶¶¶¶🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳cdsalunkhe¶¶¶¶¶¶¶¶¶

Leave a Reply