शिरपूरची सुनबाई सौ. योगेश्वरी राकेश बडगुजर यांनी अमेरिकेतून मास्टर डिग्री संपादन – श्री. चंद्रकांत बडगुजर सर, बोराडी

शिरपूर येथील श्री. विलासराव दंगल बडगुजर (सेवानिवृत्त मुख्याध्यापक) आणि सौ. अनिता विलासराव बडगुजर यांची सुनबाई आणि वर्षी ता. शिंदखेडा येथील श्री.दिनेश मच्छिंद्र बडगुजर (माध्यमिक शिक्षक, पलूस जि.सांगली) आणि सौ.सुनिता दिनेश बडगुजर यांची सुकन्या सौ. योगेश्वरी राकेश बडगुजर यांनी अमेरिकेतील टेक्सास ए अँड एम युनिव्हर्सिटी (Texas A&M University) मधून मास्टर ऑफ डेटा सायन्स (MS- Data Science)या विषयात डिग्री संपादन केली. १२ ऑगस्ट २०२३ रोजी डिग्री प्रदान समारंभ प्रसंगी टेक्सास ए अँड एम युनिव्हर्सिटी चे प्रमुख डीन आणि इतर प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत डिग्री प्रदान समारंभ युनिव्हर्सिटीच्या आवारात मोठ्या थाटात संपन्न झाला. श्री. व्हि. डी. बडगुजर सर यांचे द्वितीय चिरंजीव राकेश यांनी टेक्सास येथील ए अँड एम (Texas A&M University) या यूनिवर्सिटीतून मास्टर ऑफ कॉम्प्युटर सायन्स (MS- Computer Science) डिग्री चे शिक्षण करून तेथेच सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून नामांकित कंपनीत तीन वर्षापासून सर्विस करत असून राकेश विलासराव बडगुजर यांच्यासोबत योगेश्वरीचा विवाह झाल्यानंतर सौ. योगेश्वरी राकेश बडगुजर यांनी लग्नानंतर उच्च शिक्षणाची इच्छा व्यक्त केली. सासरकडील लोकांनी उच्च शिक्षणासाठी सौ. योगेश्वरीला होकार दिला. सौ.योगेश्वरीने लग्नानंतर संसार सांभाळून उच्च शिक्षण केले याचे विशेष महत्त्व सासर व माहेरकडील सर्वांना आहे. श्री. व्हि. डी. बडगुजर सर यांनी आपल्या परिवारास सुशिक्षित व सुसंस्कृत केले. त्यांनी आपल्या तिनही मुलांना उच्च शिक्षित तर केलेच सोबतच मोठी सुन सौ. रूतुजा सागर बडगुजर हिस सुध्दा उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित केले व आज त्या नामांकित कंपनी मध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे आता व्दितीय सुन सौ. योगेश्वरी यांनी सुध्दा उच्च शिक्षण घेत विशेष यश संपादन केले.

ब्रिटिश जर्नल ऑफ स्पोर्ट मेडिसिन मध्ये डॉक्टर चेस स्ट्रॉ यांच्यासोबत सौ.योगेश्वरी राकेश बडगुजर यांचा रिसर्च पेपर प्रकाशित झाला. तसेच शिक्षण घेत असा रिसर्च पेपरचा विषय “सिंथेटिक टर्फ आणि नैसर्गिक टर्फ ग्रास दरम्यान तापमान, हायड्रेशन आणि कार्यक्षमतेतील फरक गरम वातावरणात स्पर्धात्मक सॉकर सामने” असा विषयावर रिसर्च केला.

शिरपूर व शिरपूर तालुका येथील बडगुजर समाज व इतर सर्व समाजातील बंधू भगिनींनी सौ. योगेश्वरी चे खूप कौतुक करून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. बडगुजर. इन टिम कडून सौ. योगेश्वरी राकेश बडगुजर यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

1 Comment

Leave a Reply to Bhagwan Girnar Cancel reply

Your email address will not be published.


*