नर्मदा परिक्रमा:एक विलक्षण अनुभूती👇भाग👇५०.👇
*नर्मदे हर हर…
*मागच्या भागात मी माझ्या आयुष्याची दिशा बदलली असं सांगितलं होतं. कुण्या साक्षीचा ही उल्लेख केला होता. ते सगळं आता या भागात सांगते. तर महेश्वर ला पोहोचायला आम्हाला संध्याकाळ झाली. तिथल्या बाजारातून जाताना “श्री राधे ज्वेलर्स” म्हणून एका सराफा दुकानदाराने ने चहा ला बोलावलं. त्यालाच विचारलं आम्ही, कुठल्या आश्रमात राहावं ते..!
*आधी त्यांनी वेगळ्याच आश्रमाचा पत्ता दिला होता, पण मग आम्ही चालू लागल्यावर तो आमच्या मागे धावत आला “आप तो जगन्नाथ धाम जाओ, वहा आपकी व्यवस्था करा दीई है” असं सांगितलं. आपण काय परिक्रमावासी, एक रात्र थांबायचं न पुढे निघायचं, मग कुठेही थांबा..आम्ही जगन्नाथ धाम ला गेलो.तिथे समोर जगन्नाथ मंदिर आहे आणि त्यासमोर संथ वाहणारी नर्मदा माई. प्रसन्न वातावरण. मी पाय-या चढून वर गेली तो एक अतिशय तेजस्वी आणि तरूण संन्यासी बसलेला होता. नर्मदे हर झालं, चौकशी झाली आणि अचानक नजर रोखून तो संन्यासी माझ्याकडे एकटक पाहू लागला. मला संकोचल्या सारखं झालं, मी नजर दुसरीकडे वळवली आणि आत निघून गेले. आत एक माताजी स्वयंपाक करत होत्या. चहा झाला, ते मघाचे संन्यासी ही आता आमच्या समोर येऊन बसले, पण आता ते एक टक बघत नव्हते. ते मला म्हणाले “साक्षी जी आप को एक काम बताऊ?,
*उपर तीन सफेद चादरे रखी है, ले आओगे?” रस्ता विचारून मी वर गेले, तिथे तीन कपाटं होती, आणि एक लाकडी पेटी होती. मी काही हात लावला नाही त्या कपाटांना, ती पेटी उघडली, तीत चादरी होत्या, त्या घेऊन खाली गेले.
*“अरे वा साक्षी, तुम ले आई चादरे?” ते म्हणाले.. मग मी त्यांना सांगितलं, माझं नाव साक्षी नाही सुरुचि आहे. तर म्हणाले यही तो समझाने की कोशिश कर रहा हू, तुमको साक्षी होना है. जब तुम आई थी तब हम तुम्हारे तरफ देख कर सोच रहे थे की शायद हम तुम्हे जानते है, या शायद इस वास्तू से या इस स्थान से तुम्हारा कोई पुराना रिश्ता है.. और अब हमे पता चला है की हम सही सोच रहे है. हमने तो तुम्हे नही बताया था न की चादरे कहां रखी है, और तुम ले आई… कैसे?.. मी म्हंटल त्यांना,“ आपकी अल्मारीयोको बिना पूछे कैसे हाथ लगाती मै, इसलिये पेटी मे देखा, तो वहा चादरे मिल गयी”.. ते म्हणाले, “ पेटी भी तो मेरी ही है? उसे कैसे हाथ लगा लिया? तब नही लगा की स्वामीजी से पुछना चाहिये? क्युं की तुम्हे पता था की हो न हो चादरे और कही नही है, तुम तो अल्मारियो की तरफ गयी भी नही?.. है ना?”
*असं झालं होतं खरं. मी त्या कपाटा जवळ फिरकली पण नव्हती. असेलही काही संबध… असेलही मी कुणी साक्षी.. पण तरी मला आठवत नाहीये!
*माझा विश्वास पण बसेना.. आणि असं असलं जरी तरी या जन्मी मी सुरुचि आहे, मग मी साक्षी का बनायचं? तुम्हे साक्षी होना है याचा अर्थ काय? मी त्या स्वामीजीं ना विचारलं तर मोठ्यांदा हसू लागले. म्हणाले “मैने तुम्हे पुराने जनम की साक्षी होने को कब कहां? तुम तुम्हारा पुराना जनम छोड के आई हो, अब इस जनम में हो, तो इस जनम की बात करो. मैने तुम्हे इस जनम मे ही साक्षी होने को कहां है.. सामाझाता हू…!
*मला कळत नव्हतं तरी मी ऐकायचं ठरवलं, आणि मग हळू हळू कळू लागलं. “साक्षी होना” म्हणजे नक्की काय हे समजल्यावर मात्र खूप आनंद झाला,सांगते.!
*ते स्वामीजी म्हणाले, तुमको हर चीज देखनी जरूर है, समझनी जरूर है, लेकीन उसपर तुम्हे प्रतिक्रिया देनी नही है. तुम्हे जो भी करना है वह तुम्हारा कार्य है यही समझ के करना है… तुम्हे द्रष्टा बनना है. चलो और आसान करके बताता हू. तुमने कभी फिल्म तो देखी होगी? उस फिल्म का तुम आनंद तो लेती हो, लेकीन क्या उसमे तुम्हारा सक्रीय सहभाग होता है? नही ना? तुम फिल्म देखती हो. कभी आनंद होता है, कभी दुख होता है, उसे वही छोडकर अपनी जिंदगी फिर से जीने लगती हो, उस आनंद या दुख को गले लगाकर नही रखती हो, क्युंकी वो सत्य नही है यह तुम्हे पता होता है. इसी प्रकार तुम्हारे आसपास होने वाली घटनाओ को तुम्हे फिल्म की तऱ्हा देखकर छोड देना है, उसे मन मे नही रखना है.
*त्यांनी बोलावं आणि मी ऐकत बसावं असं मला वाटत होतं. साक्षी होणं म्हणजे काय हे शिकणं देखील मला आनंद देणारं होतं तर मग मुळात साक्षी होणं हे कितीतरी आनंद दायक असेल? आणि हे समजावताना हे स्वामीजी मला जे जे म्हणून उदाहरण देत होते ते अगदी रोजच्या जीवनातले असल्यामुळे समजण बरंच सहज होत होतं मला.
*ते पुढे म्हणाले, “चलो एक और उदाहरण देता हू. कोई कोर्ट केस नजर के सामने लाओ. अब इस केस मे कोई एक गुनाहागार है, कोई पुछताछ कर रहा है, और किसी एक ने गुनाह होते हुये देखा है, और वह गवाही देने के लिये आया है. अब जो गवाही दे रहा है, उसने गुनाह किया नही है, ना ही उसका उस घटना से वास्तविकता मे कोई संबंध रहा है. ना ही उसके जीवन पर इस गुनाह का, उस गुन्हेगार का कोई प्रभाव पड रहा है, वो तो सिर्फ साक्ष दे रहा है की हा, ये घटना जब हुई थी तब मैने इसे होते हुये देखा था… यही तो साक्ष है.. तुम्हे यही तो करना है. उस गवाही देने वाले की तरह सिर्फ देखना है.. सब कुछ…जैसे तुम वहा हो, पर उनका तुमपर कोई प्रभाव है ही नही, क्यू की वास्तविकता मे तुम तो तुम हो ही नही… जैसे फिल्म मे तुम्हारा रोल नही है वैसे यहा भी नही है.
*साक्षी को ना आरंभ है ना अंत है, वो तो चिरकाल है, वो तो बस है, वही तो बस सत्य है. बाकी जो चल रहा है, वो चलकर रुक जायेगा, साक्षी तो वही रहेगी. चलो एक और उदाहरण देता हू. आईना तो तुम रोज देखती हो. अब बताओ, आईने ने कभी तुम्हारी जगह किसी और का प्रतिबिंब दिखाया है? कभी ऐसा हुआ है तुम निकल आई और प्रतिबिंब वही आईने मे रहा गया? नही न? आईना तुम्हे उतनाही दिखायेगा जितना है. तब तक ही दिखायेगा जब तक तुम उसके सामने खडी हो. जैसे ही तुम चली जाओगी, आईना फिरसे साफ, चमकिला सां हो जायेगा… वो कभी कोई बिंब पकड के नही रखेगा है ना?.. तुमको उस आईने जैसा होना है मेरे बच्चे.. एकदम चमकिला, साफ, शुद्ध… और केवल साक्षी..बनोगे ना साक्षी?”
*हे सगळं ऐकल्यावर मला खरच आपण साक्षी आहोत असच वाटू लागलं. आणि नसले तरी आता मला साक्षी बनायचं आहे हे मात्र मी ठरवून टाकलं. किती सरळ आणि सोपं आहे हे सगळं, फक्त ते करता आलं तर! ते करायाला कठीण मात्र. आपण किती गुंतून जातो नं छोट्या छोट्या गोष्टींमध्ये? आपल्या आयुष्यात होणा-या अनेक गोष्टी ज्याचा खरच आपल्याशी संबंध नसतो तिथे ही गुंततो आपण, आणि इथे आपल्याला आपल्याच आयुष्यात होणा-या घटनांकडे त्रयस्थासारखं बघायचं आहे. आणि माहितीये का, प्रत्येक संत महात्मा आपल्याला वेगवेगळ्या शब्दात हेच तर सांगत असतात. सियाराम बाबा म्हणतात “मै तो बस तमाशा देखता हू, जब ये खतम हो जायेगा तो दुसरा शुरू हो जायेगा, ना इसके खत्म होने का दुख, न उसके शुरू होने का सुख.. देखते रहो बस!” म्हणजे हे साक्षी होणं च नाही का? फिल्म सारखं बघणे सगळीकडे…मागे एका अनुभवात मी तुम्हाला “इदं न मम” हा मंत्र मला एका संन्याश्याने दिलेलं सांगितलं होतं की… ते म्हणजे तरी वेगळं काय? जे काही माझ्या हातावर पडतंय ते पडतंय त्या ईश्वराच्या कृपेने, पण म्हणून ते माझं नाहीच.. तेच काय, माझं काहीच नाही… पण ते पडतंय एवढी साक्ष फक्त काय ती माझी.. साक्षी होणं याला नाही का म्हणता येणार? काय नं सुंदर अवस्था असेल ती? दु:ख ही नाही आणि सुख ही नाही…. जे आहे, जसं आहे, तसं आहे म्हणून आहे, आणि जे नाही म्हणून नाही…
*हे खरं मला समजलं होतं, पटलं ही होतं पण आपल्या सारख्या साधना शून्य व्यक्तीला असं साक्षी होणं सोपं आहे का हो? मला हे आवडलं ही होतं पण अजून ही काही गोष्टीतून माझं मन निघता निघेना. त्याला कारण ही होतं म्हणा! मला अजून बरच काही समजून घ्यायचं होतं, ब-याच गोष्टींचा उलगडा व्हायचा होता. आज तर महेश्वर चा पहिलाच दिवस होता.. मात्र इथून माझ्या आयुष्याची दिशा बदलली असं मी म्हणालेय…
*मी ३ दिवस होते इथे आणि हे तीनही दिवस माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. दुस-या दिवशी जो संवाद झाला त्या वेळी मी पुरती गोंधळात पडले, मला सावरायला वेळच लागला..कारण हा संवाद होता माझ्या नाळेशी जोडलेला…माझ्या आईशी आणि माझ्या बाळाशी पण…. पण तो संवाद आणि ती स्थिती, आता नाही सांगता येणार… पुढील भाग ५१ मध्ये सांगते.!
©सुरूची नाईक – विदर्भ गट
संकलक:प्रा.सी.डी.साळुंखे, धुळे.
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️


Leave a Reply