पिंप्री येथे “मेरी माटी मेरा देश”अंतर्गत ९ ऑगस्ट क्रांतिकारी दिवस साजरा – चि. राहुल बडगुजर, सर धरणगांव

आजादी काअमृत महोत्सव या अभियानांतर्गत जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात “मेरी माटी मेरा देश”अंतर्गत संपूर्ण भारतभर ९ ऑगस्ट क्रांतिकारी दिवसाचे औचित्य साधून कोणशिलेचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी आपल्या पिंप्रीतील श्री. रवींद्र नारायण बडगुजर, श्री. गोपाल भाऊलाल कमळजा, श्री. गोरख गुलाब बडगुजर, श्री. प्रमोद चुडामण चौधरी आणि श्री. अशोक कृष्णा पवार या सेवा निवृत्त सैनिकांचा ग्रामपंचायतच्या वतीने सन्मान करण्यात आला. याप्रसंगी श्री. गोपाल बापू चौधरी, श्री. सुनील बडगुजर सर, सेवानिवृत्त सैनिक श्री. गोपाल कमळजाआणि केंद्रप्रमुख श्री. प्रमोद पाटील सरांनी आपले मनोगत व्यक्त करून उपस्थितांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास सरपंच, ग्राम पंचायत सदस्य, सदस्या, ग्राम विकास अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर, मुख्याध्यापिका, शिक्षक,शिक्षिका आणि विद्यार्थी उपस्थित होते. श्री. किशोर पाटील यांनी आभार व्यक्त केले. 👏

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*